कृषी महाविद्यालयात ३१ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:40 IST2021-01-08T05:40:43+5:302021-01-08T05:40:43+5:30

जालना : तालुक्यातील खरपुडी येथील कृषी महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३१ जणांनी रक्तदान केले. कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुडवडा ...

Blood donation of 31 people in Agriculture College | कृषी महाविद्यालयात ३१ जणांचे रक्तदान

कृषी महाविद्यालयात ३१ जणांचे रक्तदान

जालना : तालुक्यातील खरपुडी येथील कृषी महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३१ जणांनी रक्तदान केले. कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुडवडा जाणवू नये, यासाठी मध्यंतरी आयोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते, त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद म्हणून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले.

या रक्तदान शिबिरामध्ये कृषिभूषण भगवानराव काळे यांनी केलेल्या सूचनेनुसार सामाजिक अंतराचे पालन करून हे शिबिर घेण्यात आले, अशी माहिती प्राचार्य व्ही. एल. देशमुख यांनी दिली. जनकल्याण रक्तपेढी जालना यांनी रक्तसंकलन केले. यावेळी रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी वंदना शेळके, प्राचार्य डॉ. व्ही. एल. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. एस. आर. कळम, डॉ. ए. आर. महाजन, डॉ. एस. एस. काकडे, प्रा. जे. एस. मंठेकर, डॉ. ए. एस. चव्हाण, प्रा. पी. बी. कोते, डॉ. एस. आर. चौधरी, प्रा. के. एम. सोळंके, प्रा. सी. यू. कोकाटे, प्रा. तुषार देठे, प्रा. सचिन पाळणे यांनी प्रयत्न केले.

फोटो ओळ : खरपुडी येथील कृषी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य व्ही. एल. देशमुख व इतर.

Web Title: Blood donation of 31 people in Agriculture College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.