शिबिरात २४ रक्तदात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST2021-02-26T04:43:47+5:302021-02-26T04:43:47+5:30
अर्ज करण्याचे आवाहन जालना : योजनांसाठी शेतकरी, बचत गट, शेतकरी कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाच्या ...

शिबिरात २४ रक्तदात्यांचे रक्तदान
अर्ज करण्याचे आवाहन
जालना : योजनांसाठी शेतकरी, बचत गट, शेतकरी कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाच्या आत्मा विभागाकडून करण्यात आले आहे. कृषी विभागामार्फत स्मार्ट योजना तसेच अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत विविध योजना आल्या आहेत.
हिवरा राळा येथे जयंतीनिमित्त अभिवादन
जालना : बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा येथील राजकुंवर विद्यालयात संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्राचार्य लक्ष्मण हिवरेकर, ज्ञानेश्वर कदम, प्रवीण जोशी, ज्ञानेश्वर बोरुडे, अश्विन घोती, मन्सूर शेख, निखिल जाधव, रवी चव्हाण आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी
जालना : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार सामान्य प्रशासन राजीव शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार विक्रांत मोंढे, नायब तहसीलदार सरोदे, शिक्षणाधिकारी गरुड, प्रशासकीय इमारतीमधील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
वयोवृद्ध व्यक्तींना विशेष प्रशिक्षण
जालना : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनेनुसार वयोवृद्ध व्यक्तींचे आयुष्य आनंदी कसे करता येईल या विषयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सावली, सीएफआर, हेल्पेज इंडिया, फेस्कॉम व एएससीओपी या संस्थेमार्फत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
वालसावंगी येथे शिक्षकांनी घेतली लस
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील बालाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षकांनी कोरोना लस टोचून घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव रेणुकाई येथे लसीकरण कक्षात कोविशिल्ड लस घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश बावस्कर, डॉ. बावस्कर, औषध निर्माण अधिकारी नितीन सावळे, खेसर, पांढरे, ठोंबरे, शिंदे, योगेश घुले आदींची उपस्थिती होती.
बाजारपेठेत ग्रामस्थ फिरतात विनामास्क
जालना: जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या आदेशानुसार कुंभार पिंपळगाव येथे ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने बुधवारचा आठवडे बाजार ३१ मार्चपर्यंत बंद राहील अशी दवंडी देऊन नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र येथील नागरिकांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाची गंभीरता दिसून येत नाही. बाजारात नागरिक विना मास्क सर्रासपणे वावरताना दिसत आहे.
परस्पर फेरफार नोंदी चौकशीसाठी उपोषण
भोकरदन : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या परस्पर फेरफार नोंदी केल्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भीमशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पगारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.