पगीरवाडीत २१ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST2021-04-05T04:26:43+5:302021-04-05T04:26:43+5:30

जिल्हाध्यक्षपदी नबी सिपोरकर जालना : समाजवादी पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी शेख नबी सिपोरकर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड झाल्याबद्दल ...

Blood donation of 21 people in Pagirwadi | पगीरवाडीत २१ जणांचे रक्तदान

पगीरवाडीत २१ जणांचे रक्तदान

जिल्हाध्यक्षपदी नबी सिपोरकर

जालना : समाजवादी पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी शेख नबी सिपोरकर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड झाल्याबद्दल नबी यांचे सर्वत्र स्वागत होत आहे. प्रदेशाध्यक्ष आ. अबू अजमी यांनी केली आहे.

पॅथर्स पार्टीची आढावा बैठक

जालना : पॅथर्स रिपब्लिकन पार्टीची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष ॲड. योगेश गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात पक्ष अध्यक्ष तथा माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या मार्गदर्शनखाली जालना शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येऊन ते सोडविण्यासाठी पॅथर्स पार्टीतर्फे पुढाकार घेतला जाणार असल्याचे गाडगे यांनी सांगितले. यावेळी ॲड. भरत ससाणे, सागर सोनूने, प्रतीक लांडगे, अविनाश खरात, रंगनाथ म्हस्के, सुभाष चाबुकस्वार, सतीश वाहुळे, अमोल जाधव, स्वप्नील रत्नपारखे आदींची उपस्थिती होती.

श्रेया सोनटक्केचे यश

जालना : येथील संस्कार प्रबोधनी विद्यालयातील श्रेया सोनटक्के हिने बेटी बचाव-बेटी पढाव या उपक्रमात सहभाग नोंदवून उत्कृष्ट निबंध सादर केला. त्याबद्दल तिला पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. ती पहिल्या दहा विद्यार्थिंनींमध्ये झळकली आहे.

Web Title: Blood donation of 21 people in Pagirwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.