शिबिरात १३६ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST2021-01-09T04:25:12+5:302021-01-09T04:25:12+5:30
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील श्री गुरुदेव विद्या मंदिर येथे गुरूवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ...

शिबिरात १३६ जणांचे रक्तदान
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील श्री गुरुदेव विद्या मंदिर येथे गुरूवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५ महिलांसह १३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राज्य सरकारने रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून वडीगोद्री येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात संजीवनी काळे, पूनम धोंगडे, क्रांती जोशी, मनीषा थोरवे, पूनम छल्लारे या महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दत्ताजी भाले रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी कृष्णा कुलकर्णी, तंत्रज्ञ चरणसिंग चव्हाण, सहायक तंत्रज्ञ वर्षा घुमरे, गीता जाधव, सहायक संतोष मिसाळ, अनिता नांदरकर, तुषार खंडागळे, सुनीता हिरे, सुभाष तांबोळी यांनी रक्तसंकलन केले. यावेळी पोनि. शीतलकुमार बल्लाळ, सामाजिक कार्यकर्ते देवानंद चित्राल, पोउपनि हनुमंत वारे, कृषी सहायक अशोक सव्वासे, विनोद कड, संकेत डावरे, पांडुरंग गटकळ यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी रक्तदान केले. शिबिर यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक जे.आर. पुनवटकर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.