गरजू नागरिकांना ब्लँकेट, धान्यवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:02 IST2021-02-05T08:02:40+5:302021-02-05T08:02:40+5:30

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप भोकरदन : तालुक्यातील पळसखेडत्त मुर्तड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख पुंडलिक सोनुने यांच्या वतीने ...

Blankets, grain distribution to needy citizens | गरजू नागरिकांना ब्लँकेट, धान्यवाटप

गरजू नागरिकांना ब्लँकेट, धान्यवाटप

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

भोकरदन : तालुक्यातील पळसखेडत्त मुर्तड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख पुंडलिक सोनुने यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी किरण सोनुने, मुख्याध्यापक आर्यन इंगळे, पुंडलिक सोनुने, परसराम सोनुने, कौतिक सोनुने, कृष्णा सोनुने, आदित्य सोनूने यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

रेहान देशमुख यांचा सत्कार

जालना : शहरातील रेहान अनीस अहमद देशमुख यांना नुकतीच पीएच.डी. ही पदवी मिळाली आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहर उपाध्यक्ष तय्यब देशमुख, चांद देशमुख, निसार देशमुख, नगरसेवक मतीन देशमुख आदींची उपस्थिती होती.

अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी

अंबड : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, भांडण तंट्यातही वाढ होत आहे, शिवाय महिलांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचा संप

जालना : केंद्र शासनाच्या वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांनी बुधवारी संप पुकारला आहे. या संपात पदाधिकारी सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन फेडरेशनच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Web Title: Blankets, grain distribution to needy citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.