शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

बायोमेट्रिकचा बागुलबुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:02 IST

कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दररोज वर्गात हजेरी लावणे बंधनकारक करण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे पालन करण्याकडे अनेक महाविद्यालयांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे

संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शिक्षण क्षेत्रातील ढासळत्या गुणवत्तेसह घटणाऱ्या विद्यार्थी संख्येवर उपाय म्हणून आता राज्य सरकारने कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दररोज वर्गात हजेरी लावणे बंधनकारक करण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे पालन करण्याकडे अनेक महाविद्यालयांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. गेल्याच आठवड्यात शिक्षण विभागाने जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालांची तपासणी केल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे.गेल्या वीस वर्षात खासगी कोचिंग क्लासचे फॅड एवढे वाढले की, महाविद्यालये ही केवळ एक बोर्डाची परीक्षा देण्यासाठीचे रजिट्रेशन सेंटर बनली आहेत, अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. याला ज्या प्रमाणे विद्यार्थी व पालक जबाबदार आहेत, त्यापेक्षा अधिक महाविद्यालयातील प्राध्यापक आणि संस्थाचालक तसेच शासनाचे दुर्लक्ष हेही एक प्रमुख कारण म्हणावे लागेल. वाढती लोकसंख्या आणि शिक्षणक्षेत्रातील स्पर्धा यामुळे आपला पाल्य त्यात टिकला पाहिजे या दृष्टीने विचार होऊ लागला. त्यामुळेच खासगी कोचिंग क्लासची संस्कृती फोफावली आहे. दुसरे एक कारण म्हणजे सरकारने विनाअनुदानित तत्वावर सुरू केलेले भरमसाठ कनिष्ठ महाविद्यालय हे देखील आहे. ज्या प्राध्यापकांना नोकरीची संधी मिळते तेथे त्यांना किती वेतन मिळते हा संशोधनाचा विषय आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित यातील फरकही शिक्षणच्या मूळावर उठला आहे. काही मोजक्या संस्थेत प्राध्यापक म्हणून नोकरी लागण्यासाठी कसे अर्थपूर्ण व्यवहार होतात हे जगजाहीर आहे. त्यामुळे आपण कसे नोकरीला लागतो याची जाण त्यांना असते. आणि आपण कशी नोकरी दिली याची माहिती संस्थाचालकाला असल्याने कोणाचाच कोणाला धाक राहिलेला नसल्याने देखील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे वास्तव आहे. आजची परीक्षा पध्दतीही केवळ ओब्जेक्टीव झाली आहे. त्यामुळे सीईटी सारख्या अन्य पात्रता परीक्षांची तयारी करण्यातच विद्यार्थी व पालक महत्व देत आहेत. गुण मिळवणे हाच एक उद्देश विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवल्याने त्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळत नसल्याचे दिसून आले. मुलांच्या गुणवत्तेवर आणखी एक मोठा हल्ला केला आहे, तो सोशल मीडियाने आज दहावी नंतरचा विद्यार्थी हा पुस्तकात कमी आणि मोबाईलमध्ये जास्त डोके घालून बसतो आहे. नाती-गोती तसेच सामाजिक भान, जबादारी यापासून दूर जातांना दिसत आहे. प्रसिध्द शास्त्रज्ञ आईनस्टाइन यांनी फारवर्षापूर्वी सांगून ठेवले की, कल्पकता ही ज्ञानापेक्षा महत्वाची असते परंतु हे त्यांचे सुविचार पुस्तकातच आहेत. हे प्रत्यक्षात उतरवण्याची गरज आहे. परंतु हे ना शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात ना पालक यामुळे देखील युवक-युवती देखील आपल्याच जगात रमरमाण असतात. कोचिंग क्लासची फी ही सर्वसामान्य पालकांच्या खिशाला न परडवणारी आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अनेकजण पदरमोड करून का होईना पाल्याला कोचिंगला पाठवत आहेत. तसेच इतर उद्योगांप्रमाणे एज्युकेशन ही देखील एक इंडस्ट्री झाली आहे. केवळ मार्क मिळवूनच जीवनात यशस्वी होता येते, ही संस्कृती रूजत असल्याने याचे दूरगामी परिणाम होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. अनेक पालक हे त्यांचे व्यवसाय सोडून दुस-या शहरातच नव्हे तर दुस-या राज्यात पाल्यांसाठी जातात.

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducationशिक्षणState Governmentराज्य सरकार