घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:20 IST2021-01-13T05:20:42+5:302021-01-13T05:20:42+5:30
------------------------------ मंदिरासमोर उभी केलेली दुचाकी लंपास जालना : परतूर येथील साईबाबा मंदिर परिसरात उभी असलेली दुचाकी चोरून नेल्याची घटना ...

घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरीला
------------------------------
मंदिरासमोर उभी केलेली दुचाकी लंपास
जालना : परतूर येथील साईबाबा मंदिर परिसरात उभी असलेली दुचाकी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी घडली. मारोती लिंबाळकर हे दुचाकी उभी करून दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन आल्यावर त्यांना दुचाकी दिसली नाही. याप्रकरणी मारोती लिंबाळकर यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------
२४०० रुपयांची देशी दारू जप्त
जालना : अंबड तालुक्यातील बारसवाडा फाटा येथील पार्थ हॉटेलवर बेकायदेशीरित्या सुरू असलेल्या देशी दारूच्या अड्ड्यावर गोंदी पोलिसांनी रविवारी छापा टाकला. पोलिसांनी २४०० रुपयांच्या देशी व विदेशी दारूच्या बॉटल्या जप्त केल्या. याप्रकरणी पोउपनि. हनुमंत वारे यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास नापोकॉ वाघमारे हे करीत आहेत.
--------------------
देशी दारूची विक्री करणाऱ्यास अटक
जालना : विनापरवाना देशी दारूची विक्री करणाऱ्यास मौजपुरी पोलिसांनी सोमवारी जालना तालुक्यातील मानेगाव येथून ताब्यात घेतले. रवी गंगाधर ढवळे (वय २३ रा. मानेगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सय्यद मजीद सय्यद फतरू यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोह चव्हाण हे करीत आहेत.
---------------