शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात आयकरची मोठी कारवाई; २०० अधिकाऱ्यांच्या पथकाचे पहाटेच व्यापाऱ्यांवर छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 19:28 IST

सर्व अधिकारी आणि कर्मचारी सरासरी शंभर कारमधून ज्यांच्या घरी छापे टाकायचे आहेत, त्याच्या निवासस्थानी आणि औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या कंपन्यांमध्ये दाखल झाले.

जालना : शहरातील कालिका स्टील, एसआरजे स्टील, व्यावसायिक विमलराज सिंघवी यांच्यासह अन्य १० ते १२ व्यापाऱ्यांवर प्राप्तीकर विभागाने बुधवारी पहाटे छापे टाकले आहेत. या कारवाईने उद्योजक, व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, या छाप्यातून नेमके काय हाती आले, हे कळू शकले नाही. परंतु बँक खात्यांसह अन्य व्यवहारांची अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली.

या प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, तसेच औरंगाबादेतील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सरासरी शंभर कारमधून ज्यांच्या घरी छापे टाकायचे आहेत, त्याच्या निवासस्थानी आणि औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या कंपन्यांमध्ये दाखल झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी ही मराठवाड्यातील सर्वांत मोठी कारवाई असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. हे छापे टाकण्यामागचे कारण विचारले असता, ते सांगण्यास नकार देण्यात आला.

जालन्यातील जिंदल मार्केटमधील तीन दुकान या अधिकाऱ्यांनी सील केल्याचे स्टिकर चिकटविले आहे, तर दुसरीकडे उत्पादन आणि विक्री याबाबतच्या नोंदी तपासल्या असून, बँकांमधील झालेले ट्रांजेक्शनही तपासले जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कुठल्या उद्योगांचे कुठल्या बँकेेत खाते आहे, त्या बँकांचा तपशीलही अधिकाऱ्यांनी मागविला आहे. विशेष म्हणजे कुठल्या व्यापारी, उद्योजकाकडे किती रोख रक्कम आढळली की नाही, बाबतही माहिती देण्यास नकार देण्यात आला. मागील वर्षीदेखील असे मोठे छापे जालन्यातील तीन उद्योजकांवर पडले होते. परंतु त्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर अधिकारी आले नसल्याचे सांगण्यात आले.दोन दिवस चालू शकते कारवाई

एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्राप्तीकर विभागाचे अधिकारी जालन्यात येण्यामागचे कारण समजू शकले नाही. परंतु शहरातील व्यापाऱ्यांमध्ये यामुळे दिवसभर हीच चर्चा होती. कुठल्या ना कुठल्या घरभेद्याने प्राप्तिकर विभागाला पक्की टीप दिल्याशिवाय ही कारवाई होऊ शकत नसल्याचेही सांगण्यात आले. काहींनी हे छापे पडल्यावर ज्या उद्याेजक, व्यावसायिकांना काही रोखीतील उधारी देणे शिल्लक असल्यास ती टाळण्यासाठी या कारवाईचा उपयोग करून घेता येत असल्याचीही जोरदार चर्चा होती. हवालातून होणाऱ्या या उलाढालीमुळेदेखील एवढे अधिकारी येथे आले असल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIncome Taxइन्कम टॅक्सJalanaजालनाraidधाड