पर्यारण रक्षणात बांबू पिकांचे मोठे योगदान : पाशा पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:28 IST2021-02-20T05:28:31+5:302021-02-20T05:28:31+5:30

जालना बाजार समितीच्या आवारात गुरुवारी समितीचे सभापती तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आयोजित केलेल्या या शेतकरी मेळाव्याला ...

Big contribution of bamboo crops in environmental protection: Pasha Patel | पर्यारण रक्षणात बांबू पिकांचे मोठे योगदान : पाशा पटेल

पर्यारण रक्षणात बांबू पिकांचे मोठे योगदान : पाशा पटेल

जालना बाजार समितीच्या आवारात गुरुवारी समितीचे सभापती तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आयोजित केलेल्या या शेतकरी मेळाव्याला तालुक्यातील शेतकरी सुरक्षित अंतर राखून उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अप्पासाहेब कदम, युवा सेनेचे राज्य विस्तारक अनिरुद्ध खोतकर संयोजक मकरंद जहागीरदार, प्रा. संजय जाधव, भरत मानकर, विष्णू कदम, मिलिंद सावंत, यांच्यासह बाजार समितीचे संचालक यावेळी उपस्थित होते.

यावेळी पटेल यांनी बांबू वृक्षापासून निर्माण केलेल्या विविध वस्तू उपस्थितांना दाखविल्या, ज्यात बांबूपासून तयार केलेला टॉवेल, टूथब्रश, कागद, तांदूळ, लाेणची तसेच मसाला पदार्थ दखविताना ते म्हणाले की, कोणत्याही वातावरणात कोणत्याही प्रकारचे संसाधने लागत नसताना केवळ बांबूचे पीक झपाट्याने शेतकऱ्यांच्या हाती येते. वर्षाला सरासरी एकरी एक ते दोन लाख रुपये उत्पन्न या पिकापासून मिळते, असा दावा त्यांनी केला.

आपण गेली अनेक वर्षे बांबू पिकांवर काम करत असून, त्यासाठी आवश्यक असलेले संशोधन केंद्र तसेच एक महाविद्यालयही आपण सुरू केले असून, पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील गोदावरी आणि मांजरा या दोन प्रमुख नद्यांसह ११ उपनद्यांच्या दोन्ही बाजूने लाखो बांबूची लागवड करून संगोपन करणार आहे.

बांबूचे प्रयोग सर्वांसाठी महत्त्वाचे

खोतकर म्हणाले की बांबू लागवडीचे प्रयोग आपण यापूर्वीच केले असून, पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यानेच कोरोनासारख्या विषाणूजन्य आजारांना आपल्याला सामारे जावे लागत आहे. पटेल यांनी सुरू केलेला उपक्रम जीवसृष्टीसाठी अत्यावश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात बांबूची लागवड करण्यासाठी आपण सर्व ते सहकार्य करू, असेही ते म्हणाले. योवळी संचालक विष्णू चंद, वसंत जगताप, श्रीकांत घुले, पंडित भुतेकर, प्रा. संजय जाधव, अर्पण गोयल, आदींची उपस्थिती होती. भाऊसाहेब घुगे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Big contribution of bamboo crops in environmental protection: Pasha Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.