मोठा अपघात सुदैवाने टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:43 IST2018-01-24T00:43:44+5:302018-01-24T00:43:58+5:30
खडी भरून घेऊन जाणा-या एका टिप्परने बसला मागून धडक दिल्याने बसचे नुकसान झाले. तसेच बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.

मोठा अपघात सुदैवाने टळला
भोकरदन : खडी भरून घेऊन जाणा-या एका टिप्परने बसला मागून धडक दिल्याने बसचे नुकसान झाले. तसेच बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. तालुक्यातील कुंभारी फाटा परिसरात मंगळवारी दुपारी ही घटना घडली.
भोकरदन ते हसनाबाद ही बस नेहमीप्रमाणे भोकरदन बस स्थानकातून दुपारी निघाली. कुंभारी फाट्याजवळ आल्यानंतर हसनाबादकडून खडी घेऊन येणारा भरधाव टिप्पर बसच्या अगदी जवळून गेला. त्यामुळे ट्रकचे एक हुक बसच्या मागील खिडकीत अडकले. त्यामुळे खिडकी तुटली. चालक श्रीराम कड यांनी प्रसंगावधान राखत बस वेळीच थांबवली. सुदैवाने तुटलेल्या खिडकीजवळ कुणीच बसलेले नसल्यामुळे जीवित हानी टळली. बसमधील १८ प्रवासी बालंबाल बचावले. या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे दोन्ही वाहनांची धूळ उडाल्याने काहीच न दिसल्यामुळे हा अपघात घडल्याचे वाहक किशोर दाभाडे यांनी सांगितले. त्यानंतर सर्व प्रवाशांना दुस-या बसमध्ये पाठविण्यात आले. या प्र्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा नोंद नव्हता.