इमारतीचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:02 IST2021-02-05T08:02:45+5:302021-02-05T08:02:45+5:30
चालकांची कसरत अंबड : शहरांतर्गत भागातील काही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. ...

इमारतीचे भूमिपूजन
चालकांची कसरत
अंबड : शहरांतर्गत भागातील काही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पालिकेने लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
बोररांजणीत लसीकरण
घनसावंगी : तालुक्यातील बोररांजणी येथे पल्स पोलिओ लसीकरणांतर्गत बालकांना डोस देण्यात आला, यावेळी कैलास गरजे, शेषराव राठोेड, कुंता जाधव, सुरेखा साळवे, गंगाताई वारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आगीत साहित्य खाक
घनसावंगी : तालुक्यातील राजेगाव येथील बद्रीनाथ कोरडे यांच्या किराणा दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत कोरडे यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचा तलाठी विठ्ठल गाडेकर यांनी पंचनामा केला असून, भरपाईची मागणी होत आहे.
रस्त्याची दुरवस्था
जालना : शहरांतर्गत भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले असून, पालिकेने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.