भिलपुरी ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST2021-02-13T04:29:32+5:302021-02-13T04:29:32+5:30
जालना : तालुक्यातील भिलपुरी खुर्द ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आली असून, सरपंचपदी भाऊसाहेब गोरे, तर उपसरपंचपदी बाबासाहेब आंबडकर यांची बिनविरोध ...

भिलपुरी ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात
जालना : तालुक्यातील भिलपुरी खुर्द ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आली असून, सरपंचपदी भाऊसाहेब गोरे, तर उपसरपंचपदी बाबासाहेब आंबडकर यांची बिनविरोध निवड झाली.
शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच, उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून अनिल पुरी यांनी काम पाहिले. ग्रामसेवक डी.एम. गिराम यांची उपस्थिती होती. पॅनलप्रमुख भाऊसाहेब गोरे यांनी राजकारणात प्रवेश करीत सरपंचपदाची माळ गळ्यात घातली. गावच्या विकासासाठी गोरे यांनी विजयी सदस्यांना हिवरेबाजार, राळेगणसिद्धी व बहुचर्चित सरपंच भास्कर पेरे यांची प्रत्यक्ष भेट घालून दिली. गोरे म्हणाले की, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या प्रेरणेने जिल्ह्यात नव्हे, तर राज्यात भिलपुरी खुर्द ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत निर्माण करू, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य चंद्रकलाबाई गायकवाड, सागरबाई गोरे, रूक्मिणीबाई गोर, संगीताबाई गोरे, गंगूबाई गोरे, गणेश गोरे, ज्ञानेश्वर गोरे, नागराज गोरे, रामेश्वर गोरे, गंगाधर गोरे, बळीराम गोरे, रामकिसन डिखुळे, मुरलीधर गोरे, मोहन गायकवाड, विष्णुपंत गोरे, सोपान गायकवाड, विठ्ठल गोरे, प्रल्हाद गोरे, लक्ष्मण गोरे यांची उपस्थिती होती.