भांबेरी - हिरडपुरी रस्ताकामाच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:25 IST2021-01-09T04:25:23+5:302021-01-09T04:25:23+5:30
भांबेरी ते हिरडपुरी या रस्त्याचे दीड किलोमीटर अंतराचे खडीकरण व मजबुतीकरण कामासह एक नळकंडी पुलासाठी १९ लाख रुपयांचा निधी ...

भांबेरी - हिरडपुरी रस्ताकामाच्या चौकशीची मागणी
भांबेरी ते हिरडपुरी या रस्त्याचे दीड किलोमीटर अंतराचे खडीकरण व मजबुतीकरण कामासह एक नळकंडी पुलासाठी १९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. नियोजित अंदाजपत्रकानुसार रस्त्याचे व पुलाचे काम करण्याऐवजी गुत्तेदार व अधिकाऱ्यांनी मलिदा लाटण्यासाठी बोगस कामाचा सपाटाच लावला होता. परंतु, हा प्रयत्न परिसरातील ग्रामस्थांनी हाणून पाडत रस्त्याचे काम बंद पाडले. तरीही गुत्तेदार व अधिकारी चांगले काम करण्यासाठी धजावत नाहीत.
अंदाजपत्रकानुसार ४ इंच खडीचा लेअर वापरणे बंधनकारक असताना याठिकाणी १ ते २ इंच खडीचा लेअर असून चांगली वाळू किंवा कचखडी वापरण्याऐवजी मातीमिश्रीत वाळू वापरली जात आहे. या निकृष्ट कामाला ग्रामस्थांनी विरोध करूनही गुत्तेदार, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा काम होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. निवेदनावर भांबेरीतील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.