रामसगावच्या सरपंचपदी भालेकर तर उपसरपंचपदी भोजने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:32 IST2021-02-11T04:32:41+5:302021-02-11T04:32:41+5:30

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील रामसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत भालेकर, तर उपसरपंचपदी लालावंती भोजने यांची बिनविरोध निवड ...

Bhalekar as Sarpanch of Ramsagaon and Bhojane as Deputy Sarpanch | रामसगावच्या सरपंचपदी भालेकर तर उपसरपंचपदी भोजने

रामसगावच्या सरपंचपदी भालेकर तर उपसरपंचपदी भोजने

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील रामसगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत भालेकर, तर उपसरपंचपदी लालावंती भोजने यांची बिनविरोध निवड झाली.

ग्रामपंचायत निवडणुकीत पालकमंत्री राजेश टोपे यांचे खांदे समर्थक प्रशांत भालेकर यांचे पॅनल निवडून आले होते. बुधवारी सरपंचपदाच्या निवडणुकीत प्रशांत भालेकर यांची सरपंचपदी तर लालावंती भोजने यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. यावेळी नवनिर्वाचित सदस्य सुनिता नरवडे, द्वारकाबाई हिवाळे, फुलाबाई शिंदे, तुकाराम हिवाळे यांची उपस्थिती होती. या निवडीचे पालकमंत्री राजेश टोपे, सागरचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, जि.प. उपाध्यक्ष महेंद्र पवार, प्रकाश भालेकर, उदय भालेकर, अनिल भालेकर, सुरेंद्र भालेकर, प्रल्हाद भोजने, केशव अटकर, नरहरी हिवाळे, अंबादास शिंदे, शेषराव मुके, हनुमान भालेकर, जगदीश भालेकर, सीताराम गुंजकर, बबन केदारे, पंडित गोरे, भरत भोजने, घनश्याम भोजने, राजेंद्र गचांडे, अभिजीत भालेकर, विश्वास भालेकर, अशोक उमाप, अविनाश सोळंके, गणेश पटेकर, मोतीराम लिंबुटे, साहेबराव पटेकर, गौतम आव्हाड, राधाकिसन हिवाळे, संतोष भालेकर, अमोल भालेकर, अविनाश धांडे आदींनी स्वागत केले. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून आर.एन. घनवट, तलाठी गायकवाड ग्रामसेवक माघाडे यांनी काम पाहिले.

Web Title: Bhalekar as Sarpanch of Ramsagaon and Bhojane as Deputy Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.