फेसबुकवर अनोळखी सुंदरीने चॅटिंग केल्यास सावधान; ‘हनी ट्रप’ वाढले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 04:03 IST2021-06-12T04:03:27+5:302021-06-12T04:03:27+5:30
अवैध कमाईचे साधन कोण कुठून आणि कसे शोेधून काढेल, याचा अंदाज नाही. आता सोशल मीडिया तर अशा लोकांना सहज ...

फेसबुकवर अनोळखी सुंदरीने चॅटिंग केल्यास सावधान; ‘हनी ट्रप’ वाढले !
अवैध कमाईचे साधन कोण कुठून आणि कसे शोेधून काढेल, याचा अंदाज नाही. आता सोशल मीडिया तर अशा लोकांना सहज शोधणे सोपे झाले आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेले अनेकजण अशा प्रकारात फसत आहेत. पुरूषच नव्हे; तर महिलादेखील त्याला बळी पडत आहेत. या माध्यमातून ब्लॅकमेल करून मोठ्या प्रमाणात पैसा कमावला जात आहे.
प्रेमाचा बनाव करत झाली पैशांची मागणी
सोशल मीडियात प्रारंभी ओळख झाली. यातून मैत्री अधिक घट्ट झाली. त्यानंतर रोज चॅटिंग सुरू झाले. या महिलेने आपल्याला विश्वासात घेतले. यातूनच विषय पुढे वाढत गेला. व्हिडिओ चित्रीकरण कधी झाले, हे समजलेच नाही, असे एका तरुणाने सांगितले.
लाखो रुपयांना गंडा
एका युवकाला फेसबुकवर सुंदर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याने आनंदाने ती स्वीकारली. त्यांच्यात संवाद सुरू झाला. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. तरुणीने अश्लिल व्हिडिओ तयार करून लाखो रुपयांना फसवले.
महिलेने फसविले
फेसबुकवर सुंदर महिलेला एका इसमाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. तिने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. महिलेने हनी ट्रॅपमध्ये त्याला फसविले. त्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला आहे.
शंका आल्यास तातडीने संपर्क साधा
फेसबुकबरोबरच इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली फसवणूक होतेय. कोणीतरी ब्लॅकमेलिंग करत आहे, असा संशय आल्यावर संबंधीत पोलीस ठाण्याशी संपर्क करून मदत मागता येते.
संशय आल्यानंतर संवाद व इतर व्यवहार करू नये, सावधानता बाळगत अलगदपणे सुरक्षित कसे बाहेर पडता येईल. यासाठी प्रयत्न करा.
युवकांनी सतर्क असण्याची गरज
सध्या सोशल मीडियातून सायबर क्राईमचा टक्का वाढला आहे. गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांना फसविण्याचे प्रकार समोर येत आहेत. हॅनी ट्रॅपमधून गंडविले जात आहे. अत्यंत हुशारीने या टोळ्या समोरच्या व्यक्तिला फसवितात. अनोळखी व्यक्तीशी मैत्री, चॅटिंग करू नये. सतर्क राहावे.
- मारूती खेडकर, पोलीस निरीक्षक, सायबर विभाग
असे ओढले जाते जाळ्यात
फेसबकुवरुन अनोळखी सुंदरीकडून संपर्क साधला जातो. समोरचा व्यक्ती याबाबत कुठलीही खातरजमा न करता थेट संपर्क करतो आणि टप्प्या-टप्प्याने चॅटिंग, व्हिडिओ कॉलिंगही सुरू होते. प्रेमाच्या जाळ्यात तो अलगद कधी अडकला हेच समजत नाही. ज्यावेळी व्हिडिओ, फोटो आणि इतर चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे फसवणूक झाल्याचे समजते.