वर्षभरा नंतर लाभले जिल्हा सरकारी अभियोक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:56 IST2021-02-18T04:56:36+5:302021-02-18T04:56:36+5:30
जालना जिल्हा सरकारी अभियोक्त पद हे गेल्या वर्ष ते दीड वर्षापासून रिक्त होते. तत्कालीन युती सरकारमध्ये ॲड. विपुल देशपांडे ...

वर्षभरा नंतर लाभले जिल्हा सरकारी अभियोक्त
जालना जिल्हा सरकारी अभियोक्त पद हे गेल्या वर्ष ते दीड वर्षापासून रिक्त होते. तत्कालीन युती सरकारमध्ये ॲड. विपुल देशपांडे हे यांना या पदावर सलग दोन वेळेस मुदतवाढ मिळाली होती. त्यांचा कार्यकाळ संपूण दीड वर्ष लोटले आहे. परंतु जिल्हा सरकारी अभियोक्ता हे पद रिक्त होते. या पदावर वर्णी लागणावी म्हणून अनेकांनी फिल्डींग लावली होती. परंतु सध्या सहायक सरकारी अभिभोक्त म्हणून कार्यरत असलेले ॲड. दिपक कोल्हे यांची निवड या पदावर करण्यात आली आहे. या बद्ल त्यांचे पालकमंत्री राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल तसेच अन्य मित्र परिवाराकडून होत आहे.
जिल्ह्यात वेगेवगळ्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी व्हावी हे आपले उदिष्ट राहणार असून, सर्वांना नियमांनुसार न्याय देण्याचा प्रयत्न आपल्याकडून होईल असे कोल्हे यांनी यावेळी नमूद केले.