प्रस्तावित भुयारी मार्गाने दहा हजार नागरिकांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST2021-08-23T04:32:10+5:302021-08-23T04:32:10+5:30
जिल्ह्यावर अधिक लक्ष द्यावे : टोपे रावसाहेब दानवे यांच्या रूपाने आपल्या जिल्ह्याला मोठे मंत्रिपद मिळाले आहे. जे की, सर्वसामान्यांच्या ...

प्रस्तावित भुयारी मार्गाने दहा हजार नागरिकांना लाभ
जिल्ह्यावर अधिक लक्ष द्यावे : टोपे
रावसाहेब दानवे यांच्या रूपाने आपल्या जिल्ह्याला मोठे मंत्रिपद मिळाले आहे. जे की, सर्वसामान्यांच्या हिताशी संलग्न आहे. त्यामुळे दानवेंकडून मोठ्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारचे हवे ते सहकार्य करू, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. तसेच दानवेंनीदेखील आपल्या जिल्ह्याकडे अधिकचे लक्ष देण्याची गरज टोपे यांनी वर्तविली.
पालिकेने दिले ६५ लाख रुपये : गोरंट्याल
जालना शहरातील विद्युतनगर, सहकार कॉलनी, सरस्वतीभुवन कॉलनीतील नागरिकांनी माझ्याकडेही भुयारी मार्गासाठी पाठपुरावा केला होता. त्यासाठी जालना पालिकेच नाहरकत प्रामणपत्र आणि आर्थिक हिस्सा आवश्यक होता. त्यामुळे आपण तो देण्यासाठी नेहमीच तयार होतो असे सांगून तो आता रेल्वे विभागाला दिल्याचे आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले. यामुळे नागरिकांना सुविधा मिळेल यातच आपल्याला समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.