परिर्वतनाची सुरुवात स्वत:पासून करा : अंभोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:28 IST2021-02-12T04:28:22+5:302021-02-12T04:28:22+5:30
तळणी : आजच्या तरुण-तरुणींना मोबाईल हेच ऐश्वर्य वाटत असून, जो-तो मोबाईलमध्ये गुरफटलेला दिसतो. प्रत्येकाला परिवर्तन पाहिजे असेल, तर ...

परिर्वतनाची सुरुवात स्वत:पासून करा : अंभोरे
तळणी : आजच्या तरुण-तरुणींना मोबाईल हेच ऐश्वर्य वाटत असून, जो-तो मोबाईलमध्ये गुरफटलेला दिसतो. प्रत्येकाला परिवर्तन पाहिजे असेल, तर त्यासाठी स्वत:पासून सुरुवात करावी लागेल, असे आवाहन भागवत कथाकार हभप दशरथ महाराज अंभोरे यांनी केले.
तळणी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहात भागवत कथेचे निरूपण करताना अंभोरे महाराज बोलत होते.
ते म्हणाले, माणसाचे प्रारब्ध काय असते तर ते स्वत:च्या केलेल्या कर्मावरच अवलंबून असते. आजकाल आपली परिस्थिती वाईट असली की, आपण दुसऱ्यांना दोष देतो. पण स्वत: केलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करतो. दुर्योधनाने पांडवांचा छळ केला. परंतु, पांडवांनी कधीच त्याच्याविषयी दुष्ट भावना ठेवली नाही. नियती पांडवांकडून होती म्हणून विजय त्यांचा झाला. परंतु, आजही समाजात शकुनी प्रवृत्ती ही आहे. ती नष्ट करण्याची गरज असल्याचेही हभप अंभोरे महाराज म्हणाले. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती होती.