शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
3
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
6
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
7
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
8
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
10
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
11
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
12
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
13
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
14
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
15
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
16
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
17
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
18
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
19
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
20
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
Daily Top 2Weekly Top 5

'बीडचा ओबीसींचा मोर्चा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत'! मनोज जरांगेंचा थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 19:12 IST

'मी चौथी पास, पण तुम्हाला पुरून उरेन!' मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांना थेट इशारा; बीडच्या मोर्चावर मोठा गौप्यस्फोट

- पवन पवारवडीगोद्री (जालना):मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे उद्या होणाऱ्या ओबीसी समाजाच्या मोर्चावर सडकून टीका केली आहे. हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांनी पुरस्कृत केलेला दिसत असून, आरक्षणाला विरोध करणारे ओबीसी नेते केवळ 'राजकीय पोळी' भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, असे परखड मत जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

'दुधखुळे नाही, फडणवीसांचाही कंट्रोल असू शकतो'ओबीसी नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना जरांगे म्हणाले, "जीआर देवेंद्र फडणवीस साहेबांनी काढला आहे, पण त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री त्याला विरोध करत आहेत. याचा अर्थ आम्हाला कळणार नाही, एवढे आम्ही दुधखुळे नाही. यावर फडणवीस साहेबांचाही कंट्रोल असू शकतो."

'मी चौथी पास, पण सगळ्यांना पुरून उरेन'जरांगे यांनी विरोधकांना थेट आव्हान देत म्हटले, "तुम्हाला वाटते मी चौथी पास आहे, पण मी सगळ्यांना पुरून उरेल एवढी ताकद माझ्यात आहे." ते पुढे म्हणाले की, प्रत्येक जातीला लोकशाहीत मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, पण मराठा समाज कधीही दुसऱ्यांच्या लेकरांना विरोध करत नाही. "मराठ्यांनी ठरवलं तर बीडमध्ये काय, राज्यभरात पाऊल ठेवून देणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला.

ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोपओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी ओबीसी तरुणांच्या आत्महत्यांसाठी आरक्षणाला विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांना जबाबदार धरले होते. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना लक्ष्य केले. "यांना कोणी मेलं काय, यांना देणं-घेणं नाही. ही यांची राजकीय पोळी कशी भाजेल हे बघतात. यांनी ओबीसीचे आरक्षण घेऊन ओबीसींचे वाटोळं केलेले आहे," असा थेट आरोप त्यांनी केला. ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला धक्का लागत नाही हे मान्य करून मोर्चे काढणे बंद करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

'माथेसुल उठला' म्हणत वडेट्टीवारांवर टीकाकाँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले, "वडेट्टीवारला माथेसुल उठला आहे. पहिले म्हणत होता मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. आता मोर्चा काढल्यामुळे तो उघडा पडला आहे." ते पुढे म्हणाले की, "त्याने पूर्ण काँग्रेस संपवली आहे. त्याला काही कळत नाही. राहुल गांधींनी याची कानउघडणी करायला पाहिजे होती."

जीआर रद्द करणे एवढे सोपे नाही!ओबीसी नेते 'कुणबी' जीआरला विरोध करत असल्याने जरांगे यांनी त्यांना थेट आव्हान दिले. "जीआर रद्द होत नसतो, एवढं सोपं आहे का? हात लावा मग सांगतो तुम्हाला," असा इशारा जरांगे यांनी दिला. तसेच, हे आरक्षण सरसकट नसून, केवळ मराठवाड्यातील मराठा समाजासाठी आहे. मराठवाड्यातील मराठा हा कुणबीच आहे, असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Jarange alleges Ajit Pawar's NCP backing Beed OBC Morcha.

Web Summary : Manoj Jarange Patil accuses Ajit Pawar's NCP of sponsoring Beed's OBC morcha. He claims OBC leaders are exploiting reservation politics. Jarange warns against opposing Maratha reservations, asserting Maratha unity and strength.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणJalanaजालनाChhagan Bhujbalछगन भुजबळVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार