समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST2021-02-05T08:04:01+5:302021-02-05T08:04:01+5:30
जाफराबाद : धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे म्हणून समाज बांधवांच्या वतीने आंदोलन करुन शासनाकडे कागदोपत्री पाठपुरावा केला आहे. धनगड ...

समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढाई
जाफराबाद : धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे म्हणून समाज बांधवांच्या वतीने आंदोलन करुन शासनाकडे कागदोपत्री पाठपुरावा केला आहे. धनगड ऐवजी धनगर ही जात अस्तित्वात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षण हा श्रेयवादाचा मुद्दा नसून, अस्तित्वाची लढाई आहे. ती लढाई आम्ही समाजाच्या ताकदीवर जिंकणार असल्याचा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.
जाफराबाद येथील अहिल्यादेवी होळकरनगर मध्ये कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धोंडू दिवटे यांची उपस्थिती होती. यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे, जि.प. सदस्य संतोष लोखंडे, गोविंदराव पंडित, शिवदास बीडकर, दीपक बोराडे, पं.स. सभापती दगडुबा गोरे, कृउबा सभापती भाऊसाहेब जाधव, उपसभापती जगन पंडित, साहेबराव कानडजे, भाजपा शहराध्यक्ष निवृत्ती दिवटे, कैलास दिवटे, विजय वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेंढपाळांना आपल्या मेंढरांचे पालन- पोषण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा मेंढपाळांचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच प्रमुख व्यवसाय नजरेसमोर ठेवून मेंढपाळांसाठी १० लाख कर्जाची तरतूद करण्यात आली आहे. समाजासाठी आरक्षण हा महत्वाचा मुद्दा असून, त्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारमध्ये चर्चा सुरु आहे. धनगर समाजाच्या अडीअडचणी सोडविण्याबरोबरच आरक्षण मिळण्यासाठी सदैव पुढाकार घेणार असल्याचे आ. पडळकर यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास ई.के. सोरमारे, मैनाजी जोशी, समाधान बकाल, प्रमोद फदाट, जगन जोशी, कृष्णा लोखंडे, कारभारी सोरमारे, रुस्तुम दिवटे, सांडू कोल्हे, कोंडीबा सोरमारे, महादू डहाळे, हिंमतराव शेवाळे, नागोराव वैद्य, शेनफड दिवटे, शाम वैद्य, कडुबा दिवटे, नागोराव कोल्हे, सांडू बनसोडे, प्रल्हाद शेवाळे, सुखदेव कोल्हे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय वैद्य यांनी केले.