कुंभार पिंपळगावात बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:37 IST2021-02-25T04:37:49+5:302021-02-25T04:37:49+5:30
निनाद देशपांडे याची राज्य संघात निवड भोकरदन : शहरातील शूटिंग बॉलपटू निनाद रवींद्र देशपांडे याची १७ वर्षाखालील राज्य संघात ...

कुंभार पिंपळगावात बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने
निनाद देशपांडे याची राज्य संघात निवड
भोकरदन : शहरातील शूटिंग बॉलपटू निनाद रवींद्र देशपांडे याची १७ वर्षाखालील राज्य संघात निवड झाली आहे. पुढील महिन्यात गुजरातमधील अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तो राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या निवडीबद्दल निनादचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सेंद्रिय शेतमाल खरेदी वाहनाचे लोकार्पण
जालना : राष्ट्रीय शाश्वत योजनेंतर्गत सेंद्रिय शेतमाल खरेदी वाहनाचे जिल्हा अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू मगर, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, मंडल कृषी अधिकारी हिवाळे, तनपुरे, आत्माचे अरुण शिसोदे, दिनेश पारडे आदी उपस्थित होते.
साष्ट पिंपळगाव येथील उपोषण सुरूच
अंबड : तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आरक्षण मंगळवारीही सुरूच होते. या उपोषणात गावातील अनिता औताडे, शीतल औताडे, विजया औताडे, सीमा औताडे, छाया कोळपे यांच्यासह युवक, नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.