बंजारा समाजाला एकत्र येण्याची गरज - सचिन जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST2021-02-19T04:20:07+5:302021-02-19T04:20:07+5:30

अंबड तालुक्यातील पिंपरखेड तांडा येथे मंगळवारी सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. ...

Banjara community needs to come together - Sachin Jadhav | बंजारा समाजाला एकत्र येण्याची गरज - सचिन जाधव

बंजारा समाजाला एकत्र येण्याची गरज - सचिन जाधव

अंबड तालुक्यातील पिंपरखेड तांडा येथे मंगळवारी सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. नारायण कुचे, जि.प. सदस्य जितेंद्र पालकर, पं. स. सदस्य पंजाब सोळुंके, कैलास राठोड, कल्याण राठोड, प्रल्हाद जाधव, नामदेव पवार, भीमराव पवार, प्रदीप पवार, शिवलाल राठोड, साहेबराव पवार, विलास राठोड, संजय पवार आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना जाधव म्हणाले की, बंजारा समाजाला जीवनमूल्याची शिकवण देण्यात सेवालाल महाराज यांनी आपले उभे आयुष्य घातले. विश्वशांती व विश्वकल्याणाचा संदेश देणारे सेवालाल महाराज हे अविवाहित होते. जगात गरीब आणि श्रीमंत असा काही भेदभाव नाही, अशी शिकवणही त्यांनी दिली. बंजारा समाज हा जगात ५६ देशांत विस्तारलेला असून त्यांची वेशभूषा, बोलीभाषा, नृत्य, परंपरा आजही कायम आहे. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे, तेव्हाच तो ध्येय गाठू शकतो, असेही ते म्हणाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेष पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महिलांसह पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन साईनाथ उकिर्डे यांनी केले.

Web Title: Banjara community needs to come together - Sachin Jadhav