बल्लाळ यांनी साधला अंतरवालीकरांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:02 IST2021-02-05T08:02:36+5:302021-02-05T08:02:36+5:30

कोरोना योद्ध्यांचा टोपे यांच्या हस्ते सत्कार घनसावंगी : कोरोनाच्या काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल कुंभार पिंपळगाव येथील डॉ.दीपाली चव्हाण, डॉ.शिवशंकर ...

Ballal interacted with the interlocutors | बल्लाळ यांनी साधला अंतरवालीकरांशी संवाद

बल्लाळ यांनी साधला अंतरवालीकरांशी संवाद

कोरोना योद्ध्यांचा टोपे यांच्या हस्ते सत्कार

घनसावंगी : कोरोनाच्या काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल कुंभार पिंपळगाव येथील डॉ.दीपाली चव्हाण, डॉ.शिवशंकर उमरे यांचा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य उपसंचालक गोलाईत, अतिरिक्त जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अर्चना भोसले, जिल्हा आराेग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर आदींची उपस्थिती होती.

श्रीराम मंदिरासाठी परतुरात निधी संकलन

परतूर : अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माणाच्या पार्श्वभूमीवर परतूर शहरातील विविध भागातून यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करून शहरवासीयांनी मंदिर निर्माणासाठी निधीचे संकलन केले. यावेळी निधी संकलन अभियानचे पवार, गोविंद दहीवाळ, सुंदर जईद यांच्यासह शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सेवानिवृत्तीनिमित्त शिंगणे यांचा सत्कार

अंबड : शहरातील मत्स्योदरी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे प्रा.नामदेव शिंगणे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त प्राचार्य डॉ.शिवशंकर घुमरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गीता शिंगणे, प्रा.चंद्रसेन कोठावळे, प्रा.पोपटराव सुरासे, पर्यवेक्षक पांडुरंग काळे, प्रा.डॉ.पडघन, प्रा.देविदास जंगले, प्रा.प्रशांत तौर, प्रा.दीपक राखुंडे आदींची उपस्थिती होती.­

Web Title: Ballal interacted with the interlocutors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.