आमदार बच्चू कडू यांच्याकडून जालना लोकसभेसाठी चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 05:47 IST2018-05-06T05:47:53+5:302018-05-06T05:47:53+5:30

जालना लोकसभा मतदार संघात सध्या आपण जनमत चाचणी घेत असून, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेळप्रसंगी आपण ही लोकसभा निवडणूक जालना मतदार संघातून लढविण्याच्या दृष्टीने विचार करणार असल्याचे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

Bachu Kadu seeks inquiry for Jalna Lok Sabha | आमदार बच्चू कडू यांच्याकडून जालना लोकसभेसाठी चाचपणी

आमदार बच्चू कडू यांच्याकडून जालना लोकसभेसाठी चाचपणी

जालना  - जालना लोकसभा मतदार संघात सध्या आपण जनमत चाचणी घेत असून, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेळप्रसंगी आपण ही लोकसभा निवडणूक जालना मतदार संघातून लढविण्याच्या दृष्टीने विचार करणार असल्याचे शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
बच्चू कडू यांनी यापूर्वीही जालना लोकसभा मतदार संघात आपण खा. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढणार असल्याचे सांगितले होते. शनिवारी कडू हे जालना दौऱ्यावर आले होते. रावसाहेब दानवे यांनी सहा महिन्यांपूर्वी शेतक-यांच्या विरोधात अपशब्द वापरून त्यांचा एक प्रकारे अपमान केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी आपण जालना लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी तयार आहोत, असे कडू यांनी म्हटले होते.

Web Title: Bachu Kadu seeks inquiry for Jalna Lok Sabha