कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जनजागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST2021-09-06T04:34:16+5:302021-09-06T04:34:16+5:30
जाफराबाद : राज्य शासनाच्या वतीने कार्ड या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जाफराबाद तालुक्यात कोरोना जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. ...

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जनजागृती अभियान
जाफराबाद : राज्य शासनाच्या वतीने कार्ड या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जाफराबाद तालुक्यात कोरोना जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ११ गावांत जनजगृती करण्यात येत आहे.
तालुक्यातील शिराळा, बुटखेडा, पापळ, नळविहीरा, गणेशपूर, अकोला, पोखरी, काचनेर, ब्रह्मपुरी, कुंभारी, डोलखेडा या गावांत कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांचे टेम्प्रेचर व ऑक्सिजन लेव्हल तपासण्यात आली. ग्रामीण भागात सद्या सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसत असल्याने, त्यांना उपचाराचा सल्ला दिला जात आहे. या जनजागृती अभियानासाठी कार्ड संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुवर्णा दांडगे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. रामदास निहाळ, सचिव पुष्कराज तायडे, सहसचिव रघुनाथ शेवाळे, कोषाध्यक्ष सोनिया तेलगड, संचालक सुनीता मगरे, मंगल रसाळ, आरोग्यसेविका मनीषा सोनवणे, ज्योती चांदोडे हे परिश्रम घेत आहे.