कोरोनाबाबत जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:37 IST2021-02-25T04:37:47+5:302021-02-25T04:37:47+5:30

थकीत बिलाची वसुली मंठा : महावितरणच्यावतीने थकीत वीज बिल वसुलीसाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकामार्फत थकबाकीदारांकडे ...

Awareness about corona | कोरोनाबाबत जागृती

कोरोनाबाबत जागृती

थकीत बिलाची वसुली

मंठा : महावितरणच्यावतीने थकीत वीज बिल वसुलीसाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकामार्फत थकबाकीदारांकडे जाऊन वीज बिल वसुलीची मोहीम राबविली जात आहे. तसेच जनजागृतीही केली जात आहे.

खडकावाडीत अभिवादन

घनसावंगी : तालुक्यातील खडकावाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जयमंगल जाधव, भास्कर वराडे आदींची उपस्थिती होती.

कारवाई मोहीम सुरू

जालना : कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, मास्क न घालता अनेकजण बाजारात फिरत आहेत. अशा नियम मोडणाऱ्यांवर पोलीस व नगरपालिकेच्या पथकाकडून संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली आहे.

ग्लिरीशिडिया बहरला

पारध : येथून जवळच असलेल्या मढ गावाजवळील जंगलात ग्लिरीशिडिया चांगलाच बहरला आहे. या भागामध्ये येणाऱ्या पर्यटकांचे हे बहरलेले झाड लक्ष वेधून घेत आहे.

Web Title: Awareness about corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.