जयराम खेडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:35 IST2021-08-17T04:35:42+5:302021-08-17T04:35:42+5:30
पुरस्कार सोहळा शनिवारी येथील कोठारी हिल्सच्या सभागृहात झाला. कोठारी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष विनयकुमार कोठारी यांच्या हस्ते खेडेकर यांना ...

जयराम खेडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
पुरस्कार सोहळा शनिवारी येथील कोठारी हिल्सच्या सभागृहात झाला. कोठारी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष विनयकुमार कोठारी यांच्या हस्ते खेडेकर यांना रोख २५ हजार रुपये तसेच सन्मानपत्र आणि शाल, श्रीफळ देवून गौरविण्यात आले. यावेळी प्रसिद्ध रंगकर्मी राजकुमार तांगडे आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सुलभा कुलकर्णी यांनाही विशेष कामगिरीबद्दल अनुक्रमे अकरा हजार रुपये आणि पाच हजार रुपये रोख तसेच सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन कोठारी यांनी गौरविले.
सुभाष होळकर यांनी सूत्रसंचालन केले. या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर मान्यवरांचे कवि संमेलनही रंगले. यामध्ये प्रा. खेडेकर, कवयित्री सुलभा कुलकर्णी, विद्रोही कवी राम गायकवाड यांच्यासह अन्य स्थानिक कवींनी यात सहभाग नोंदविला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी विवेकानंद संस्थेने परिश्रम घेतले.
———