पूर्णा नदीपात्रातील ८ वाळू पट्ट्यांचे लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST2021-01-01T04:21:23+5:302021-01-01T04:21:23+5:30

तळणी : मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील ८ वाळू पट्ट्यातील ७० हजार ब्रास वाळू उपसापोटी शासनाला १७ कोटी रुपयांचा महसूल ...

Auction of 8 sand belts in the entire river basin | पूर्णा नदीपात्रातील ८ वाळू पट्ट्यांचे लिलाव

पूर्णा नदीपात्रातील ८ वाळू पट्ट्यांचे लिलाव

तळणी : मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील ८ वाळू पट्ट्यातील ७० हजार ब्रास वाळू उपसापोटी शासनाला १७ कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे.

मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील वझर सरकटे २, टाकळखोपा- दूधा १, भूवन- शिरपूर १, इंचा- सासखेडा १, कानडी- लिबंखेडा १, कानडी- उस्वद १, देवठाणा- उस्वद २, देवठाणा- उस्वद ३ या पट्ट्यातील ७० हजार ७२६ ब्रास वाळूतून १६ कोटी ९७ लाख ३ हजार ५१२ रुपयांचा महसूल मिळणार आहे. ३१ डिसेंबर ते १५ जानेवारीदरम्यान ई-लिलाव होणार असून, वाळू उत्खननासाठी ३० सप्टेंबर २०२१ ही मुदत असणार आहे.

वझर सरकटे वाळू पट्ट्यातून ७६ लाख ५९ हजार ५४४, टाकळखोपा- दुधा पट्ट्यातील १ कोटी ५३ लाख २१ हजार २५६, इंचा- सासखेडा २ कोटी ७५ लाख ७६ हजार ९६०, कानडी- लिबंखेडा ३ कोटी २१ लाख ७३ हजार १२०, कानडी- उस्वद ३ कोटी ४४ लाख ७३ हजार ३६८, देवठाणा- उस्वद २ या वाळू पट्ट्यांत १ कोटी १९ लाख ९५ हजार ५४४, देवठाणा- उस्वद १ कोटी ८३ लाख ८६ हजार ८०८, भूवन- शिरपूर वाळू पट्ट्यांतून १ कोटी ३४ लाख ०६ हजार ९१२ रूपयांचा महसूल मिळणार आहे.

Web Title: Auction of 8 sand belts in the entire river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.