महिला आरक्षणाच्या सोडतीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:04 IST2021-02-05T08:04:29+5:302021-02-05T08:04:29+5:30
जाफराबाद : येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींसाठी गुरुवारी सकाळी आरक्षण सोडत झाली. यात सोनगिरी, टाकळी, शिंदी या ग्रामपंचायती ...

महिला आरक्षणाच्या सोडतीकडे लक्ष
जाफराबाद : येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींसाठी गुरुवारी सकाळी आरक्षण सोडत झाली. यात सोनगिरी, टाकळी, शिंदी या ग्रामपंचायती मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत. या आरक्षण सोडतीनंतर आता महिला आरक्षण सोडतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
जाहीर झालेल्या आरक्षणात अनुसूचित जातीसाठी वीरखेडा- भालकी- रेपाळा, टेंभुर्णी- गणेशपूर, निवडुंगा, सावरगाव म्हस्के, खापरखेडा, गोपी, भारडखेडा- सोनखेडा, भातोडी ग्रामपंचायत आरक्षित झाली आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी कोणड, बुटखेडा ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. मागास प्रवर्गासाठी सोनगिरी, अकोलादेव, टाकळी- गारखेडा, शिंदी या ग्रामपंचाती राखीव आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी वरखेडा- विरो- सावरखेडा, कुंभारझरी, मंगरूळ- डोलखेडा बु., रूपखेडा बु., सातेफळ, चापनेर, धोंडखेडा, हनुमंतखेडा, पोखरी, सावरखेडा गोंधन, डोलखेडा खु., खानापूर- वरखेडा फिरंगी, वरूड खु., नळविहारा, जानेफळ, बोरगाव बु.- बोरगाव म. - बोरी, देऊळझरी, सोनगिरी, अकोला देव, टाकळी- गारखेडा व शिंदी या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. यावेळी नायब तहसीलदार केशव डकले, गजानन चिंचोले, राजेंद्र हेलगट, विजय परिहार, एकनाथ शेवत्रे, राजीव साळवे, अरुण अवकाळे, प्रभाकर शेजूळ, समाधान फलके, मधुकर देठे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
सर्वसाधारणसाठी ३९ ग्रामपंचायती
तालुक्यातील वरूड बु., घाणखेडा, भारज बु., ब्रह्मपुरी, निमखेडा बु., कुंभारी, सांजोळ, काळेगाव, हिवराकाबली, म्हसरूळ, चिंचखेडा, डावरगाव, तपोवन गों- निमखेडा खु., शिराळा- वाढोणा, मेरखेडा, खासगाव, देळेगव्हाण, तोंडोळी -गाडेगव्हाण, काळेगाव, दहीगाव, पापळ, पासोडी, कोल्हापूर- भोरखेडा, माहोरा, सवासणी, आरतखेडा- गोकुळवाडी, सावंगी, गोंधणखेडा- खामखेडा, आंबेगाव -डहाकेवाडी, आढा, डोणगाव, सिपोरा अंभोरा, देऊळगाव उगले-पिंपळखुटा, आसई, भारज खु.- कुसळी- अंधारी, जवखेडा ठेंग- बोरखेडी गायकी, नांदखेडा- कुसळी- काचनेरा, हिवराबळी- हारपाळा, आळंद बोरखेडी चिंच या ३९ ग्रामपंचायती सर्वसाधारणासाठी आरक्षित झाल्या आहेत.