एकावर तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST2021-01-10T04:23:48+5:302021-01-10T04:23:48+5:30
जालना : माझ्या घरासमोरील लिंबाच्या झाडाखाली बसू नका, असे म्हणताच तिघांनी एकाला तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना जुना ...

एकावर तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न
जालना : माझ्या घरासमोरील लिंबाच्या झाडाखाली बसू नका, असे म्हणताच तिघांनी एकाला तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना जुना जालना भागातील जमुनानगर येथे शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये विक्रम बालाजी जगधने (४५, रा. जमुनानगर, जालना) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी तिघांना अटक केली आहे.
तेड्या सय्यद, बाबी सय्यद व अन्य एकजण फिर्यादीच्या घरासमोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बसले होते. तेव्हा फिर्यादी विक्रम जगधने यांनी ‘तुम्ही लिंबाच्या झाडाखाली बसू नका’, असे म्हणताच आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. तेड्या सय्यद याने फिर्यादीच्या हातावर तलवारीने वार करून जखमी केले. फिर्यादीची पत्नी भांडण सोडविण्यास आली असता, तिलाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विक्रम बालाजी जगधने यांच्या फिर्यादीवरून तेड्या सय्यद, बाबी सय्यद व अन्य एकाविरुध्द शनिवारी रात्री कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सोळुंके यांनी दिली. पुढील तपास उपनिरीक्षक सोळुंके करत आहेत.