जुना जालन्यातून मुले पळविण्याचा प्रयत्न; दोन प्रकार उघडकीस
By Admin | Updated: March 2, 2015 00:51 IST2015-03-02T00:40:19+5:302015-03-02T00:51:21+5:30
जालना : जिल्ह्यात मुले पळविण्याच्या प्रकारांच्या अफवा अधिक असल्या तरी प्रत्यक्षात असा प्रकार घडल्याच्या दोन घटना शहरात उघडकीस आल्या आहेत

जुना जालन्यातून मुले पळविण्याचा प्रयत्न; दोन प्रकार उघडकीस
जालना : जिल्ह्यात मुले पळविण्याच्या प्रकारांच्या अफवा अधिक असल्या तरी प्रत्यक्षात असा प्रकार घडल्याच्या दोन घटना शहरात उघडकीस आल्या आहेत. मात्र अशा प्रकारच्या घटना केवळ अफवाच असल्याचा दावा कदीम जालना पोलिसांनी केला आहे.
शहरात मुले पळविण्याच्या अफवांमुळे पालकांमध्ये कमालीचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी संख्या रोडावली आहे. खरे काय आणि खोटे काय? असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. परंतु गेल्या दोन दिवसांमध्ये शहरात दोन ठिकाणी मुले पळविण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना समोर आल्याने पालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
जुना जालन्यातील इंदिरानगर भागातील शेख समीर शेख नसीर (वय १७ वर्षे) या युवकास शुक्रवारी पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. याबाबत समीरने कदीम जालना पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, २७ फेबु्रवारी रोजी दुपारी २ च्या सुमारास मुक्तेश्वर मंदिराजवळील छोट्या तलावामध्ये आपण शौचास गेलो असता अज्ञात इसम तोंडावर पट्या लावून लाल रंगाच्या कारमधून आले. माझ्याजवळ त्यांनी गाडी थांबविली व माझ्या कॉलरला धरून गाडीमध्ये ओढून त्यांनी मला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मी त्यांच्या हाताला हिसका देऊन स्वत:ची सुटका करवून घेतली व आरडाओरड केली, असेही तक्रारीत म्हटले आहे.या दोन्ही घटनांबाबत कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांना विचारणा केली असता, शहरात अशा घटनांच्या अफवा अधिक प्रमाणात होत असल्याचे ते म्हणाले. रोशनी लाड हिच्याविषयी आमच्याकडे तक्रार आली नाही, असे ते म्हणाले. तर शेख समीर याच्या तक्रार अर्जाची चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले.
२७ फेबु्रवारी रोजी जुना जालन्यातील गवळी मोहल्ला भागातील रोशनी मोहन लाड (वय ८ वर्षे) या मुलीस पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. रोशनी दुपारी शनिमंदिरजवळील अमृतेश्वर मंदिरासमोरून घायाळनगरकडे शिकवणीसाठी जात होते. सोबत असलेल्या मैत्रिणीने रस्ता ओलांडला, मात्र वाहनांमुळे रोशनी मागे राहिली. त्याचवेळी एका इसमाने तिच्या तोंडावर चिकटपट्टी लावून तिला मारहाण करत भाग्यनगरमधील सुरेखा प्राथमिक शाळेसमोर नेले. तेथे एका दगडावर बसवून तिला धाक दाखवत या इसमाने तेथून कुठून तरी दोरी आणली व त्याने रोशनीचे दोन्ही हात बांधले.
४पुन्हा तिला चापटा मारत आश्लेषा किडस्समोरून नेताना या किडस्च्या संचालिका मुंडे यांनी हा प्रकार पाहिला. मुंडे यांनी सदर इसमास मुलीला मारहाण का करतोस? अशी विचारणा करताच सदर इसमाने तेथून पळ काढला. त्यानंतर मुुंडे यांनी रोशनीच्या तोंडावरील चिकटपट्टी काढून तिच्या पालकांना तेथे बोलावले.