जिल्ह्यात २०२० मध्ये ८५ सरकारी कर्मचाऱ्यांवर झालेे हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:20 IST2021-01-13T05:20:20+5:302021-01-13T05:20:20+5:30
जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यांतून गोदावरी नदी वाहाते. नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूची तस्करी केली जाते. वाळू तस्कारांवर कारवाई करण्यासाठी ...

जिल्ह्यात २०२० मध्ये ८५ सरकारी कर्मचाऱ्यांवर झालेे हल्ले
जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यांतून गोदावरी नदी वाहाते. नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूची तस्करी केली जाते. वाळू तस्कारांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकांवर हल्ले केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. दुसरीकडे भोकरदन, जाफराबाद तालुक्यांतही मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले आहेत. यात महसूल, पोलीस विभागांतील सर्वाधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात २०१९मध्ये ६८ कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले होते, तर २०२०मध्ये तब्बल ८५ जणांवर हल्ले झाले आहेत. बांधकाम, आरोग्य, ग्रामसेवक व तलाठी यांच्यावरही हल्ले होतात.
गतवर्षी दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी सर्वच गुन्हे उघडीस आल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.
४८ जणांवर कारवाई
सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या ४८ जणांवर पोलीस विभागाने कारवाई केली आहे. त्यापैकी बहुतांश जणांना ताब्यातदेखील घेण्यात आले आहेत. जे आरोपी फरार आहेत, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस विभागाच्या वतीने सांगण्यात आले. गतवर्षीपेक्षा यंदा हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
महसूल,पोलीस विभागाला केले जातेय टार्गेट
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी केली जाते. वाळू तस्कारांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकातील पोलीस व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक हल्ले केल्याच्या घटना घडलेल्या आहेत.