कोरोनाच्या सूचनांचे पालन करताना दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:03 IST2021-02-05T08:03:25+5:302021-02-05T08:03:25+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जालना : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनातील सूचनांचे अंमलबजावणी करून ज्ञानदान करावे, ...

कोरोनाच्या सूचनांचे पालन करताना दमछाक
लाेकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनातील सूचनांचे अंमलबजावणी करून ज्ञानदान करावे, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. परंतु, विद्यार्थ्यांनी सुरक्षित अंतराचे पालन आणि मास्कचा वापर करावा, अशा सूचना देताना शिक्षकांच्या नाकीनव येत आहेत. अशात अधिकाधिक प्रमाणात सूचनांचे पालन व्हावे, यासाठी शिक्षक प्रयत्नशील आहेत.
लॉकडाऊन शिथिलतेनंतर प्रारंभी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले होते. या वर्गात जवळपास ७० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. गत चार दिवसांपासून पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू झाले आहेत. कोरोना तपासणीत आजवर जिल्ह्यातील ३१ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. संबंधित शिक्षकांवर उपचार सुरू आहेत. सध्या ६१ हजारांवर विद्यार्थी शाळेत येत आहेत. परंतु, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मास्कचा वापर करीत नाहीत. शिवाय शाळेत सुरक्षित अंतराचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी सूचनांचे पालन करावे, यासाठी शिक्षक धडपड करीत आहेत.
शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलांनी कोरोनातील सूचनांचे पालन करावे, याकडे विशेष लक्ष दिले जाते. विशेषत: शाळेकडून पालकांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या असून, सूचनांचे पालन करून ज्ञानदान केले जात आहे.
- सुनील सोनटक्के, शिक्षक
शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलांनी कोरोनातील सूचनांचे पालन करावे, याकडे शाळेतील सर्व सहकरी लक्ष ठेवून असतो. कोरोनातील सर्व सूचनांचे पालन करूनच विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जात आहे.
- शहाजी देवकर, शिक्षक
शाळेच्या पहिल्या दिवशी काही मुलांनी कोरोनातील सूचनांकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, आम्ही विद्यार्थ्यांना कोरोनाची माहिती देऊन सूचनांचे पालन करण्यास सांगितले. त्यामुळे विद्यार्थी सूचनांचे पालन करीत आहेत.
- रामनाथ शेवाळे, शिक्षक
एकूण शाळा
१८५४
विद्यार्थी उपस्थिती
६१,९८७
शिक्षक उपस्थिती
९,९६०