एकास चौघांची मारहाण : गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST2021-04-01T04:30:49+5:302021-04-01T04:30:49+5:30
भीमनाईक तांडा येथे एकाला मारहाण जालना : जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी एकास मारहाण केल्याची घटना अंबड शहरातील भीमनाईक ...

एकास चौघांची मारहाण : गुन्हा दाखल
भीमनाईक तांडा येथे एकाला मारहाण
जालना : जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी एकास मारहाण केल्याची घटना अंबड शहरातील भीमनाईक तांडा येथे घडली. याप्रकरणी बाबू दलसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी साहेबराव दलसिंग चव्हाण, शांतीलाल साहेबराव चव्हाण, रावसाहेब चव्हाण यांच्याविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
किरकोळ कारणावरून एकास मारहाण
जालना : किरकोळ कारणावरून एकास चौघांनी मारहाण केल्याची घटना शहागड येथे ३० मार्च रोजी घडली. याप्रकरणी प्रकाश परदेशी यांच्या फिर्यादीवरून गणेश जीवन परदेशी, अर्जुन संतोष परदेशी, दिलीप जीवन परदेशी, राजू सुभाष परदेशी (सर्व रा. शहागड) यांच्याविरुध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेका शेख हे करीत आहेत.