शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शन मागविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST2021-08-24T04:33:58+5:302021-08-24T04:33:58+5:30
सकाळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, शिक्षणाधिकारी इंगळे यांच्यासह अन्य विभागाचे प्रमुख अधिकारी बैठकीस हजर ...

शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शन मागविले
सकाळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, शिक्षणाधिकारी इंगळे यांच्यासह अन्य विभागाचे प्रमुख अधिकारी बैठकीस हजर होते. या बैठकीत पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यावर चर्चा करण्यात आली. शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स यांच्यातील वेगवेगळ्या भूमिकांमुळे जिल्ह्यात शाळा सुरू करण्यास अडचणी येत आहेत.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षण विभागाकडून सविस्तर खुलासा मागवावा, अशा सूचना दिल्या. त्यामुळे जिल्ह्यात आजघडीला तरी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय झालेला नाही. जिल्ह्यात सध्या आठवी ते बारावीपर्यंतच्या २७ टक्के शाळा सुरू आहेत. त्यात विशेष करून जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक असल्याची माहिती देण्यात आली.
चाैकट
विद्यार्थ्यांच्या मानसिक वाढीवर परिणाम
एकीकडे शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न केले जात असतानाच सुरू असलेल्या शाळांमध्ये अपेक्षित विद्यार्थी संख्या हजर नसल्याचे सांगण्यात आले. शाळेतील ही उपस्थिती कोरोनामुळेदेखील खालावली असल्याचे सांगण्यात येते. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यास पालक उत्सुक नाहीत; परंतु यामुळे विद्यार्थ्यांच्या एकूण शैक्षणिक आणि मानसिक वाढीवर परिणाम होत असल्याचे शिक्षणतज्ज्ञांनी नमूद केले आहे.