शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

मडके घडविणाऱ्या अश्विनीने जिद्दीने दिला जीवनास आकार; एकाच वेळी ६ सरकारी पदांवर निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 5:41 PM

दोन वर्षांच्या मेहनतीचे फळ, सहा सरकारी नोकरीवर झाली निवड

- शिवचरण वावळेजालना : केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ या उक्तीप्रमाणे अश्विनी मोटरकर हिने मातीच्या मडक्यांना आकार देत जिद्दीने अभ्यास केला. अनेक स्पर्धा परीक्षांना सामोर गेली. तिच्या या जिद्दीच्या जोरावर तिच्यासाठी एक-दोन नव्हे, तर एकाच वेळी सहा शासकीय नोकरीची दारे उघडली गेली आहेत. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.

घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असल्याने अश्विनीने रोज वडील गोरखनाथ मोटारकर यांना मातीची मडके घडविण्यात मदत करायची. घडवलेली मडकी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात वडील माठ विक्रीसाठी बसत असे. कधी ग्राहक मिळत होते, तर कधी नाही. रोज नवीन धडा शिकवणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करत तिने शहरातील मावसभावाकडे राहून वाणिज्य शाखेत पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 

यानंतर स्पर्धा परीक्षेसह इतर शासकीय सेवेतील संधी शोधणे सुरू केले. त्यासाठी तिला सलग दोन वर्षांपासून कठीण परीक्षेला सामोर जावे लागले. तरी यश प्राप्त होताना दिसत नव्हते. मात्र मातीच्या घड्याला आकार देताना अनेक वेळा घडवलेला मातीचा घडा फुटतो आणि पुन्हा नव्याने मातीला आकार देऊन घडा तयार करावा लागतो. त्याप्रमाणे तिने परीक्षेत अपयश आले तरी, जिद्द कधीच सोडली नाही. 

दोन वर्षांच्या मेहनतीचे फळ, सहा जागी निवडदोन वर्षांनी का होईना तिच्या मेहनतीला फळ आले आहे. एक-दोन नव्हे तर, तब्बल सहा सरळ सेवा भरती परीक्षांमध्ये अश्विनीने यश संपादन केले. यात बारामती येथील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्टेनोग्राफर, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लिपिक, महसूल विभागातर्फे घेण्यात आलेली तलाठी भरती परीक्षा, जालना जिल्हा परिषद लेखा विभागात कनिष्ठ सहायक, बृहन्मुंबई महानगरपालिका येथे टायपिस्ट आणि जालना जिल्हा परिषदेसाठी स्टेनोग्राफर अशा सहा ठिकाणी तिला नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. 

नुकताच झाला विवाह नुकतेच अश्विनीचे जालना शहरातील स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेले उच्च शिक्षित सचिन गोडबोले यांच्यासोबत विवाह झाला आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेच्यावतीने जालना महापालिकेचे सहायक आयुक्त केशव कानपुडे यांनी तिचा सत्कार केला. अश्विनी सध्या बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्टेनोग्राफर या पदावर कार्यरत आहे.

टॅग्स :JalanaजालनाMPSC examएमपीएससी परीक्षा