बाहेरगावी जाताय? पोलिसांना कळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:16 IST2019-05-01T01:16:14+5:302019-05-01T01:16:31+5:30
उन्हाळ्याच्या सुटीमध्ये अनेक कुटुंबिय पर्यटनासाठी, अथवा नातेवाईकाकडे सुट्या घालविण्यासाठी जातात. मात्र हीच संधी साधून चोरटे चोरी करतात. याचा नाहक फटका संबंधित कुटुंबियांना सहन करावा लागतो.

बाहेरगावी जाताय? पोलिसांना कळवा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : उन्हाळ्याच्या सुटीमध्ये अनेक कुटुंबिय पर्यटनासाठी, अथवा नातेवाईकाकडे सुट्या घालविण्यासाठी जातात. मात्र हीच संधी साधून चोरटे चोरी करतात. याचा नाहक फटका संबंधित कुटुंबियांना सहन करावा लागतो.
आपल्या घराच्या सुरक्षेसाठी बाहेरगावी जाताना याविषयी संबंधित पोलीस ठाण्यास कळवूनच गावी जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नागरिकांनी बाहेरगावी जाताना घरातील मौल्यवान वस्तू, दस्तऐवज घरात न ठेवता ते बँक अथवा लॉकरमध्ये ठेवावेत, बाहेरगावी जात असल्याचे शेजाऱ्यांना कळवावे, तसेच आपल्या घरासमोरील विजेचे दिवे सुरु ठेवावेत, शक्य असल्यास रखवालदाराची नियुक्ती करावी, आपल्या घराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवावेत, तसेच संबंधित पोलीस ठाण्याला गावाला जात असल्याची माहिती द्यावी. असे आवाहनही पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी केले आहे. यामुळे पोलिसांना सतर्क राहून गस्त वाढविणे शक्य होणार आहे.