एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST2021-04-01T04:30:43+5:302021-04-01T04:30:43+5:30
जालना : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबरोबरच तापमानातदेखील झपाट्याने वाढ होत आहे. मार्च महिन्यातच तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले ...

एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप
जालना : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबरोबरच तापमानातदेखील झपाट्याने वाढ होत आहे. मार्च महिन्यातच तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात मार्च, एप्रिल व मे महिन्यांत सर्वाधिक तापमान असते. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळतात. यंदा मात्र, तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी उन्हात घराबाहेर पडू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. बुधवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३९, तर किमान तापमान ३८ अंश सेल्सिअस होते. पुढील महिन्यात जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवारचे रेकॉर्ड
बुधवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३९, तर किमान तापमान ३८ अंश सेल्सिअस होते.
तापमान वाढल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहे. बुधवारी दुपारी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.
असा राहिला आठवडा
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कडाक्याचे ऊन तापत आहे. जिल्ह्यात गुरुवारी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस होते. त्यानंतर शुक्रवारी ४०, शनिवारी ३९, रविवारी ३९, सोमवारी ३९ व मंगळवारी कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस होते.