पं.अप्पासाहेब जळगावकर ‘संगीत महोत्सव’ उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:16 IST2018-07-22T00:15:54+5:302018-07-22T00:16:36+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कलाकारांनी आयोजित केलेला पाचवा पं. अप्पासाहेब जळगावकर संगीत महोत्सव उत्साहात पार पडला.

पं.अप्पासाहेब जळगावकर ‘संगीत महोत्सव’ उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात कलाकारांनी आयोजित केलेला पाचवा पं. अप्पासाहेब जळगावकर संगीत महोत्सव उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातील शहरातील तबला वादक व गिनिज बुक्स आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित असलेले प्रसाद चौधरी यांनी राग दरबारी कानडा या रंगामध्ये ‘घर जाणे दे, मोरी बैया’ हा छोटा ख्याल व त्यानंतर ‘बैरान घर ना जा’ हा दादरा गायली.
त्यांना संकेत शार्दूल व हार्मोनियम वादक विनायक लोहागावकर यांनी चांगली साथ दिली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात पं. राजेंद्र कुलकर्णी (बासरी) व सुरेश फडतरे (हार्मोनियम) यांनी राग मारू बिहाग वाजविला.
कार्यक्रमाच्या तिस-या भागात पंडित मकरंद हिंगणे यांचा पंडित अप्पासाहेब जळगावकर सन्मान हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर हिंगणेंनी अभिषेकीबुवांनी अजरामर केलेली ‘लागी कलेजवा कटार, हे सुरांनो चंद्र व्हा’ अशी पदे घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित जोशी यांनी केले. यावेळी शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.