सतरा दिवसांत चार हजार रुग्ण आढळल्याने चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST2021-03-18T04:29:42+5:302021-03-18T04:29:42+5:30
जालना जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीने सामान्य माणूस धास्तावला आहे. असे असतानाच यावर कुठला उपाय करावा, जेणेकरून रुग्णसंख्या घटेल, या चिंतेत ...

सतरा दिवसांत चार हजार रुग्ण आढळल्याने चिंता
जालना जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीने सामान्य माणूस धास्तावला आहे. असे असतानाच यावर कुठला उपाय करावा, जेणेकरून रुग्णसंख्या घटेल, या चिंतेत प्रशासन आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून केल्या जात आहेत. आता अनेक ठिकाणी आवाहन करूनही गर्दी कमी होण्याचे चिन्ह नसल्याने हे रुग्ण वाढत आहेत. ही रुग्णवाढ नेमकी कुठल्या कारणाने होत आहे, याबद्दल तज्ज्ञदेखील केवळ अनुमान बांधत आहेत.
या संदर्भात येथील डॉक्टर राजेश सेठिया म्हणाले की, वातावरण बदलानेदेखील अनेकांना सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे आहेत. परंतु, जर तीन दिवसांपेक्षा अधिक ही लक्षणे कायम राहून थकवा जाणवल्यास लगेचच संबंधितांनी कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे. एकूणच विषाणूने त्याचे रूप बदलले असून, ही बाब गंभीर आहे. या रूपबदलातून पूर्वीइतकी भयानकता नसून, हा विषाणू केवळ झपाट्याने स्प्रेड होत आहे. यावर उपाय म्हणून सुरक्षित अंतर तसेच मास्कचा वापर बंधनकारक केला पाहिजे. हे काम प्रशासनावर सोडून जमणार नाही, तर त्यासाठी वैयक्तिक पातळीवरच खबरदारी घ्यावी लागणार आहे.
रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागाची कसरत
अचानक रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, परंतु त्यांना जास्त त्रास नाही, अशांना आता त्यांच्या घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. तर, यासाठी जिल्हा प्रशासनाने अलगीकरण केंद्राची व्यवस्था केली आहे. तेथेही आता रुग्ण वाढत आहेत. मध्यंतरी, रुग्ण घटल्याने हे अलगीकरण कक्ष बंद केले होते. ते नव्याने सुरू करण्यात आले आहेत.
चौकट
एक ते १७ मार्च दरम्यानचे रूग्ण