संत शिरोमणी नरहरी महाराजांची जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:34 IST2021-08-21T04:34:34+5:302021-08-21T04:34:34+5:30
अंबड येथे आयोजित कार्यशाळेस प्रतिसाद अंबड : निसर्गाचे रक्षण व्हावे, समतोल राखावा यासाठी मुख्याध्यापक रवींद्र जामदार यांनी ज्ञानयोगी फाउंडेशनच्या ...

संत शिरोमणी नरहरी महाराजांची जयंती
अंबड येथे आयोजित कार्यशाळेस प्रतिसाद
अंबड : निसर्गाचे रक्षण व्हावे, समतोल राखावा यासाठी मुख्याध्यापक रवींद्र जामदार यांनी ज्ञानयोगी फाउंडेशनच्या वतीने शाडू मातीपासून गणपती मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन मत्स्योदरी देवी मंदिरात केले होते. अध्यक्षस्थानी डॉ. योगेश ढेंबरे होते. या कार्यशाळेला तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. या वेळी ज्ञानयोगी फाउंडेशनचे अध्यक्ष हृषीकेश जामदार, अभिजित पटवारी, रवी भोसले, कैलास शिंदे, विलास आरसूळ, ओंकार दहिवाळ, रोहकले, मुळे, अभिषेक जामदार, अथर्व वैद्य आदींची उपस्थिती होती.
पुलाचे काम गतीने करण्याची मागणी
जालना : तालुक्यातील रामनगर ते भिलपुरी रस्त्यावर असलेल्या भिलपुरीजवळील पुलाचे काम अत्यंत कासवगतीने सुरू असून, वाहनधारकांना पुलाच्या बाजूने पर्यायी कच्चा रस्ता करून देण्यात आला आहे. सध्या पावसाची रिमझिम सुरू असल्याने कच्च्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. वाहनचालकांना वाहने चालवताना त्रास होत आहेे. मौजपुरी, माणेगाव, निरखेडा, भिलपुरी, दहिफळ, मोतीगव्हाण आदी गावच्या लोकांना रामनगरला येण्यासाठी याच रस्त्यावरून ये - जा करावी लागते. पुलाचे काम तातडीने करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
रामनगर येथे नाना पटोले यांचा सत्कार
जालना : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे वाटूर दौऱ्यावर जात असताना जालना तालुक्यातील रामनगर येथे कार्यकर्त्यांनी त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार केला. या वेळी लखन टेमकर, ॲड. सोपान शेजूळ, नितीन कानडे, सिद्धू आमटे, अंकुश कल्हापुरे, संदीप कल्हापुरे, गजानन कल्हापुरे, प्रकाश कल्हापुरे, निवृत्ती सरकाळे, गणेश श्रीखंडे, एकनाथ सरकाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
खांबेवाडी येथील कार्यशाळेस प्रतिसाद
जालना : तालुक्यातील खांबेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील कृषिदूत साईनाथ राठोड यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, डॉ. यू. जी. जगदाळे, डॉ. एम. व्ही. अजोतीकर, सरपंच द्वारकाबाई खरात, उपसरपंच सुशीला सदावर्ते, ग्रामसेवक ठाकरे, दयाराम राठोड, मुख्याध्यापक विष्णू बिरादार, एस. बी. गोगे, एस. सी. खलाणे, शोभा राठोड, आकाश राठोड, प्रकाश राऊत आदी उपस्थित होते.
नायगाव येथे मोफत रोगनिदान शिबिर
मंठा : रक्षाबंधनाचे औचित्य साधून मंठा तालुक्यातील नायगाव येथे रविवारी सकाळी १० वाजता ग्रामपंचायतीच्या वतीने महारोगनिदान व आहारविषयक मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी प्रशांत रोहनकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी सरपंच गजानन फुपाटे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे, अविनाश राठोड, रमेश घोळवे, एच. आर. ताठे यांची उपस्थिती राहणार आहे. शिबिरात सुनील राठोड, डॉ. उमेश राठोड, डॉ. उमेश जाधव हे रुग्णांची तपासणी करतील.