अध्यक्षपदी अंकुश पाचफुले, तर कार्याध्यक्षपदी शुभम टेकाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:16 IST2020-12-28T04:16:59+5:302020-12-28T04:16:59+5:30
जालना : सार्वजनिक राष्ट्रमाता माँ जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अंकुश पाचफुले, तर कार्याध्यक्षपदी शुभम टेकाळे यांची निवड करण्यात आली. ...

अध्यक्षपदी अंकुश पाचफुले, तर कार्याध्यक्षपदी शुभम टेकाळे
जालना : सार्वजनिक राष्ट्रमाता माँ जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अंकुश पाचफुले, तर कार्याध्यक्षपदी शुभम टेकाळे यांची निवड करण्यात आली. आगामी माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्सव समिती गठित करण्यासाठी रविवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी अंकुश पाचफुले, कार्याध्यक्षपदी शुभम टेकाळे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून बाबा गवळी, गणेश सोळंके, अनिरुद्ध झाल्टे, आकाश जगताप यांचा समावेश आहे. नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड. रोहित बनवसकर, सागर चौधरी, करण जाधव, मिलिंद गंगाधरे, मंगेश कापसे, योगेश सोळंके, स्वप्नील धुमाळ आदींची उपस्थिती होती. दरम्यान, सर्वसमावेशक अशी उर्वरित कार्यकारिणी लवकरच गठित केली जाईल, असे नवनिर्वाचित अध्यक्ष अंकुश पाचफुले यांनी सांगितले.
फोटो