शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त नागरिकांचा हंडामोर्चा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:47 IST

पुणेगाव येथे टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी महिला, नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या वाढत चालली आहे. गावात पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक, महिलांतून रोष व्यक्त होत आहे. पुणेगाव येथे टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी महिला, नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले.जालना तालुक्यातील पुणेगाव येथे सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी जि.प. कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले होते. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक टँकर मजूर केले. एक दिवस गावात टँकरही आले. परंतु, त्यानंतर गावात टँकर आलेच नाही.एका टँकरवर तहान भागविणे अवघड झाले आहे. पाणी टंचाईच्या या समस्येकडे सरपंच, ग्रामसेवकाकडून दुर्लक्ष होत आहे. यामुळे गावात दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले. यावेळी कारभारी साहेबराव अंभोरे, शांता दारकड, लता करपे, सतीश इंगळे, नारायण घुगे, धोंडीराम चुनखडे, धोंडीराम चुनखडे, सोपान उगले, राजाभाऊ चुनखडे आदींची उपस्थिती होती.पाण्यासाठी रास्ता रोकोचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री / जामखेड : अंबड तालुक्यातील बारासवाडा येथील गल्हाटी धरणात जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यातून पाणी सोडविण्यात यावे, अशी मागणी वीस गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन सोमवारी अंबड तहसीलदारांना देण्यात आले. मागणी मान्य न केल्यास ‘रास्ता रोको’ करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.यंदाच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गल्हाटी धरण संघर्ष समिती व परिसरातील शेतकरी अनेक वर्षांपासून गल्हाटी धरणात जायकवाडी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करत आहे. याबाबत ०२ मार्च २०१९ रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शहापूर येथे रास्ता रोको करण्यात आला होता. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही शेतक-यांनी घेतला होता. परंतु, अंबड तहसीलदारांच्या मध्यस्तीने हा निर्णय मागे घेण्यात आला होता. मात्र, अद्यापही याची दखल प्रशासनाने घेतली नाही.गल्हाटी धरणात पाणी नसल्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गल्हाटी धरणात प्रशासनाने तात्काळ पाणी सोडावे, अशी मागणी शेतकºयांच्यावतीने करण्यात आली. येत्या चार दिवसात पाणी सोडले नाही तर ३१ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी संतोष जेधे, पांडुरंग गटकळ, बंडू मैद, ए. एस. जाधव, संतोष झनझने, प्रवीण पवार, अनिल राठोड, अनिल सावंत, रमेश सोनवणे, उमेश गव्हाणे आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलनwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ