वीकएण्ड लॉकडाऊनचा शब्द फिरवल्याने संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST2021-04-07T04:30:54+5:302021-04-07T04:30:54+5:30
चौकट लाखोंची उलाढाल ठप्प जालन्यात वीकएण्डला करण्यात येणारा लॉकडाऊन हा मंगळवारपासूनच सुरू केला आहे. त्याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना ...

वीकएण्ड लॉकडाऊनचा शब्द फिरवल्याने संताप
चौकट
लाखोंची उलाढाल ठप्प
जालन्यात वीकएण्डला करण्यात येणारा लॉकडाऊन हा मंगळवारपासूनच सुरू केला आहे. त्याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसला आहे. आधीच पंधरा दिवसांपासून व्यवहार हे थंडावलेलेच होते. त्यात आता ही भर पडल्याने आम्ही हतबल झालो आहेात. कोरोनाचे नियम पाळून व्यापार करावेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. परंतु प्रशासाने याचा अर्थ चुकीचा काढून आमची दिशाभूलच केली आहे. त्याचा नव्याने विचार करण्याची गरज आहे.
सतीश पंच, शहराध्यक्ष, व्यापारी महासंघ जालना
---------------------------------------
लोकशाही मार्गाने मागणी रेटणार
कोरोनाची संख्या वाढणे ही चिंतेची बाब आहे. यावर प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने जो वीकएण्डचा लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याला आमचा कडाडून विरोध राहणार आहे. आम्ही नियम पाळून व्यापार करत आहोत. तसेच शासनाच्या तिजोरीत जीएसटीसह प्राप्तिकराचा मोठा भरणाही करतो. केवळ कोरोना विषाणू फैलावास आम्हीच जबाबदार आहोत, असा आरोप आमच्यावर ठेवून लॉकडाऊन लादले जाते. ही बाब चिंतेची आहे. याच मुद्द्याला धरून मंगळवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, तसेच आ. कैलास गोरंट्याल यांची भेट घेतली. या वेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनित साहनी, श्याम लोया, डॉ. संजय रूईखेडकर, दिलीप शाह, सुभाष देविदान, बंकट खंडेलवाल, ईश्वरचंद बिलोरे, कचरूलाल कुंकूलाेळ आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
चौकट
स्टील उद्योगासह अन्य उद्योजक अडचणीत
एकीकडे शासन अर्थचक्राला धक्का न लावता लॉकडाऊन करणार असल्याची घोषणा केली. परंतु वास्तवात मंगळवारी जे बंद संदर्भात आदेश काढले आहेत. त्यातून उद्योग केवळ नावाला सुरू राहणार असल्याचे दिसते. वैद्यकीय सेवा वगळता ऑक्सिजनचा वापर बंद केला असून, ऑक्सिजन हा विविध कामांसाठी उद्योजकांनाही तो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. परंतु तोच बंद केला आहे. त्यातच स्टील उद्योगाला मोठ्या प्रमाणावर स्क्रॅप अर्थात भंगार लागते. परंतु भंगार खरेदीसह त्याची वाहूक बंद राहणार आहे. त्यामुळे कच्चा मालच मिळणार नसेल तर हा उद्योग चालेल कसा, असा सवालही स्टील उद्योजकांनी उपस्थित केला.