सेंद्रिय शेती गटांना फळे व भाजीपाला वाहतुकीसाठी वाहनाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:31 IST2021-02-10T04:31:34+5:302021-02-10T04:31:34+5:30
जालना- कृषी विभागाच्या वतीने परंपरागत कृषी विकास प्रकल्प सेंद्रिय शेतीच्या योजनेतून घनसावंगी तालुक्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी गटांना ...

सेंद्रिय शेती गटांना फळे व भाजीपाला वाहतुकीसाठी वाहनाचे वाटप
जालना- कृषी विभागाच्या वतीने परंपरागत कृषी विकास प्रकल्प सेंद्रिय शेतीच्या योजनेतून घनसावंगी तालुक्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी गटांना वाहनाचे वाटप आत्माचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक बाळासाहेब शिंदे, उपसंचालक अभिमन्यू मगर, उपविभागीय कृषी अधिकारी नवनाथ कोकाटे, पोकराचे नित्यानंद काळे, आत्माचे दत्तात्रय सूर्यवंशी, मुरलीधर गाढवे, अर्जुन मद्दलवार, प्रवीण झिने यांची उपस्थिती होती. सेंद्रिय शेतीअंतर्गत शेती गटांसाठी शेतमाल वाहतूक करण्यासाठी योगेश्वर सेंद्रिय शेती गट शिंदे वडगाव, तुकाराम रामचंद्र गव्हाणे, समर्थ किसान सेंद्रिय शेती म. चिंचोली या गटांना वाहन देण्यात आले आहे. याचा फायदा शेतकरी गटातील सदस्यांना होणार असून, जवळच्या किंवा लांबच्या बाजारपेठेत सेंद्रिय शेतमाल वाहतूक करण्यासाठी होणार आहे. या गटांना १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या २९ शेतकरी गटांना अशा गाड्याचे वाटप लवकरच करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.