अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST2021-09-07T04:36:17+5:302021-09-07T04:36:17+5:30
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सीमा काकडे यांनी संघटनेने मागील काळात केलेल्या कामाचा आढावा दिला. त्यानंतर निवड प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी ...

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सीमा काकडे यांनी संघटनेने मागील काळात केलेल्या कामाचा आढावा दिला. त्यानंतर निवड प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी डॉ. रवींद्र काकडे यांची, तर जिल्हा सरचिटणीस म्हणून सुखदेव चव्हाण, कार्याध्यक्षपदी विष्णू वाघमारे, जिल्हा नेतेपदी म. नईम म. बशीर, विजय खरात, नसीम शेख, संतोष बोर्डे यांची निवड करण्यात आली. महिला विंगच्या जिल्हाध्यक्षपदी सीमा काकडे, तर सरचिटणीसपदी नूतन मघाडे यांची निवड करण्यात आली. जालना तालुकाध्यक्षपदी गौतम गवई, बदनापूर अरुण हिवाळे, जाफराबाद नसीम शेख,
घनसांवगी संजय खरात, परतूर बाबासाहेब भापकर, सरचिटणीसपदी सुरेश तोटे, तर मंठा तालुकाध्यक्षपदी संदीप इंगोले यांची निवड करण्यात आली. महिलांच्या जालना तालुकाध्यक्षपदी वैशाली देशमुख, तर सचिवपदी सुनीता चव्हाण यांची निवड करण्यात आली. बदनापूर तालुका सरचिटणीसपदी संध्या कानडे यांची निवड करण्यात आली. अंबड तालुकाध्यक्षपदी श्रीदेवी सूर्यवंशी यांची, तर सरचिटणीसपदी सुनीता गायकवाड, घनसावंगी तालुकाध्यक्षपदी अर्चना गुंगे यांची निवड करण्यात आली. यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.