ऑल इंडिया जमियातुल कुरेशी संघटना गठीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST2021-02-06T04:55:20+5:302021-02-06T04:55:20+5:30
सेवानिवृत्तीनिमित्त जाधव यांचा सत्कार अंबड : कृषी विभागात कार्यरत असलेले कृषी सहाय्यक एकनाथ भानुदास जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात ...

ऑल इंडिया जमियातुल कुरेशी संघटना गठीत
सेवानिवृत्तीनिमित्त जाधव यांचा सत्कार
अंबड : कृषी विभागात कार्यरत असलेले कृषी सहाय्यक एकनाथ भानुदास जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, कृषी अधिकारी शीतल नागवडे, कृषी पर्यवेक्षक श्रीराम बडे, विनोद कड, सुरेश डुकरे, विजय जाधव, अशोक सावसे, गोवर्धन उंडे, भाऊसाहेब साबळे, कुलकर्णी, पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने पारितोषिकांचे वितरण
अंबड : जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास राजेश राऊत, विमल आगलावे, संतोष गाजरे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा विभावरी ताकट, मनिषा पाटील, वर्षा देशमुख, डॉ. मंगल मुळे, सुवर्णा राऊत, सविता मोरे, योगिता टकले, सूचिता शिनगारे, आशा नागे आदींची उपस्थिती होती.
जेथलिया यांचा खोतकरांच्या हस्ते सत्कार
जालना : चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल यश जेथलिया यांच्या निवासस्थानी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी सत्कार केला. यावेळी पालक नंदकिशोर जेथलिया, डॉ. सुभाष अजमेरा, ॲड. अनुराग कपूर, शिवाजी गोन्टे, पंडितराव भुतेकर, यांच्या सह जेथलिया कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी जेथिलया यांनी मनोगत व्यक्त केले.