लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : मागणी करूनही हाताला काम मिळत नसल्याने कामगारांनी बुधवारी येथील नगर पालिकेसमोर चूल पेटवून आंदोलन केले.रोहयोच्या कामासाठी परतूर क वर्ग नगरपालिकेचे मजूर मागील तीन वर्षांपासून आंदोलन करीत आहेत. त्यात आलेल्या मंदीमुळे अनेक कामगारांच्या हाताला कामे नाहीत. काम नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त कामगारांनी सरिता शर्मा यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पालिकेसमोर चूल पेटवून आंदोलन केले. शिष्टमंडळाने नगराध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सरिता शर्मा यांच्यासह मथुरा गोरे, रीना नरवय्ये, कुशवर्ता माटे, लता सदावर्ते, उनवने, गंगूबाई कदम, शारदा गोरे, रेणुका सागुते, मीरा गायकवाड, गयाबाई शेळके, तारामती ढवळे यांच्यासह कामगार महिला उपस्थित होत्या.
नगर परिषदेसमोर पेटविली चूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 01:05 IST