साष्टपिंपळगावातील आंदोलन गावागावात गेले पाहिजे- पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:02 IST2021-02-05T08:02:51+5:302021-02-05T08:02:51+5:30
साष्टपिंपळगाव येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून आपली भूमिका मांडली. मागास समाजाला ...

साष्टपिंपळगावातील आंदोलन गावागावात गेले पाहिजे- पाटील
साष्टपिंपळगाव येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून आपली भूमिका मांडली.
मागास समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत तरतुदी केलेल्या आहेत. ज्यावेळी मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले त्यावेळी मोर्चाला पाठबळ मिळाल्यासारखे वाटले आणि त्याचा फायदा म्हणून अनेक जण आमदार झाले. कुणी मंत्री झाले. आजकालच्या राज्यकर्त्यांनी मात्र, मराठा समाज धोक्यात आणल्याचे दिसत आहे. राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाचे राजकारण करण्यात गुंतले आहेत. काही सत्ताधा-यांच्या आडमुठ्या धोरणामुळे आरक्षण जात असेल तर समाजातील लोकांनी जाब विचारला पाहिजे. जे मराठा आमदार मराठा आरक्षणावर बोलणार नाहीत. त्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरून देऊ नका. राणे समितीने न्यायालयात आरक्षाणाची माहिती मांडताना मागासवर्गीय आयोगाचा अहवाल न घेतल्याने न्यायालयाने आरक्षण नाकारले. कोरोना काळात एमपीएससी परीक्षेंतर्गत मिळालेल्या नियुक्त्या न्यायालयाने आरक्षण नाकारल्याने अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी यावेळी विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, खासदार बंडू जाधव, आमदार लक्ष्मण पवार, भाजपाचे रमेश पोकळे यांनीही मत व्यक्त केले.
फोटो