जिल्ह्यात ६०० मतदारांचे वय १०० पेक्षा अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST2021-02-05T07:59:06+5:302021-02-05T07:59:06+5:30
मतदारांचा टक्का वाढावा, नवमतदारांनी मतदार यादीत आपल्या नावाचा समावेश करावा, यासाठी निवडणूक आयोगाने विशेष मोहीम राबविली. त्यानुसार बहुतांश नवमतदारांनी ...

जिल्ह्यात ६०० मतदारांचे वय १०० पेक्षा अधिक
मतदारांचा टक्का वाढावा, नवमतदारांनी मतदार यादीत आपल्या नावाचा समावेश करावा, यासाठी निवडणूक आयोगाने विशेष मोहीम राबविली. त्यानुसार बहुतांश नवमतदारांनी आपले नाव यादीत समाविष्ट केले. त्यानुसार प्रशासनाने नुकतीच मतदारांची यादी प्रसिध्द केली आहे. यात ८३००७४ पुरूष व ७५१२७३ महिला असे एकूण १५,८१,३६३ मतदार असल्याचे समोर आले. यात परतूर विधानसभा संघात ३,००,११०, घनसावंगी ३,१६,१६८, जालना ३,४३,२३७, बदनापूर ३,१३,९४९, भोकरदन ३,०७,८९९ इतके मतदार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात १९३३४ नवमतदार
जालना जिल्ह्यात यंदा १९ हजार ३३४ नवमतदारांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट केले आहे. यात परतूर विधानसभा मतदार संघात २३९०, घनसावंगी ४३३४, जालना ४५५४, बदनापूर ३८५२, भोकरदन विधानसभा मतदार संघात ३२०४ नवमतदार आहेत.